तळोदा : दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने शहरासह तालुक्यात जोरदार हजेरी लावली असून, दोन्ही दिवस मिळून काही तासांच्या पावसात तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेतकरीराजा सुखावला असून, सर्वत्र पाणी साचले आहे.
अनेक शेतात पाणी भरले असून, कपाशीला या पावसाचा फायदा होईल. मात्र सोयाबीन, मूग, उडीद व इतर गळीत धान्य पिकांच्या नुकसानीची शक्यता आहे. विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. (Heavy rain returns in Taloda)
तालुक्यात बुधवार (ता. २५), गुरुवार (ता. २६) असे सलग दोन दिवस परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. केवळ दोन दिवसांच्या काही तासांच्या पावसाने तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी सायंकाळी ३०, तर गुरुवारी सायंकाळी ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
तालुक्याची ७८८ मिलिमीटर पावसाची सरासरी आधीच ओलांडली गेली असून, २७ सप्टेंबपर्यंत एक हजार १८४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र नदी-नाले तुडुंब भरले. दुसरीकडे ज्या क्षेत्रात कापसाची बोंडे फुटण्यास सुरुवात झाली, तेथे कपाशीच्या नुकसानीची भीती आहे.
त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचा नजरा कापसाकडे लागल्या आहेत. दरम्यान, परतीचा पाऊस ५ ऑक्टोबरपर्यंत राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यंदाच्या समाधानकारक पावसाने शेतकरीराजा सुखावला आहे. (latest marathi news)
शेतकऱ्यांना दिलासा
यंदाच्या पावसात जुन्या विहिरीलाही पाणी आले. त्यात कूपनलिकांची पातळी वाढली. त्यामुळे बागायती शेती पूर्णपणे भूगर्भातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
२७ सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस
तळोदा- ७५ मिमी
बोरद- ६४ मिमी
प्रतापपर- ४८ मिमी
सोमावल- ४४ मिमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.