Nandurbar Accident News : डंपर्सनी आठवड्यात 5 जणांना चिरडले; डझनभर लोक जायबंदी

Accident News : वाहतुकीवर नियंत्रण आणत अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागासह पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत कठोर कारवाईची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
Nandurbar Accident
Nandurbar Accident esakal
Updated on

Nandurbar Accident News : तालुक्यात केवळ आठवड्याभरात भरधाव डंपरच्या धडकेने पाच जणांचा बळी घेत डझनभर लोकांना जायबंदी केल्याने तालुक्यातील या डंपर वाहतुकीवर नियंत्रण आणत अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागासह पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत कठोर कारवाईची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. अक्कलकुवा तालुक्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर डंपर वाहतूक फोफावली असून तालुक्यातून सुमारे शंभर डंपर दररोज बांधकाम साहित्य पुरवण्यासाठी रस्त्यावर धावत आहेत. ( in Dumpers accident 5 people dead in week )

यातील काही डंपर क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे साहित्य सातपुड्याच्या घाटामध्ये ने-आण करीत आहेत. रस्त्यावर धावणारी अनेक डंपर जुनाट असून विना क्रमांकाने धावत आहेत. यातील अधिकाधिक डंपर हे गुजरात राज्य परिवहन विभागाने प्रमाणित केलेले आहेत. हे डंपर सर्रासपणे गुजरातमधून महाराष्ट्रात बांधकाम साहित्य तसेच रेतीची वाहतूक करीत आहेत.

विशेष म्हणजे अनेक डंपर्स चालकांकडे परवाने नसल्याचेही निदर्शनास आले असून अनेक चालक अप्रशिक्षित असून अनेक वाहनांना रस्त्यावर धावण्यासाठी विविध परवानग्याही नसल्याने या वाहतुकीवर परिवहन विभागाने लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे. तालुक्यातील सातपुड्याच्या देवगोई घाटात एका भरधाव डंपरने भगदरी येथील एका कुटुंबीयांच्या मालकीच्या चार चाकी वाहनाला मागून जबर धडक देत एकाला जागीच गतप्राण केले तर चार जणांना गंभीर जखमी केले.

Nandurbar Accident
Nandurbar Accident News : बाभळे फाट्याजवळ अपघातात; 2 तरुण ठार

त्याच दिवशी दुचाकीस्वारांना त्याच डंपरने ठोस देत एकाला जागीच ठार करून दोघांना गंभीर जखमी केले. दोन दिवसांनंतर शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील राजमोही गावाजवळ एका रिक्षाला भरधाव डंपरने धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर सहा जणांना गंभीर जखमी केले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा शेवाळी-नेत्रंग या महामार्गावर कौली गावाजवळ अतिवेगाने धावणाऱ्या डंपरने तीन दुचाकीस्वारांना धडक देत दोन तरुणांना चिरडले तर सहा जणांना जायबंदी केले आहे. या डंपर्सच्या वाढत्या अपघातांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

डंपर्स चालकांना बक्षिसी

तालुक्यातील डंपर्स बांधकाम साहित्य वाहून येताना परिवहन विभागाचे अधिकारी नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत या संदर्भाची माहिती डंपर चालकांच्या विशेष व्हाट्सअप ग्रुपवरून माहिती घेऊन पुढील प्रवास करतात. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना डंपर्स चालक चकवा देऊन भरधाव निघून जातात. विशेष म्हणजे डंपर चालकाला आपली एक फेरी पूर्ण केल्यावर बक्षिसी रक्कम मिळत असल्याने ते भरधाव वाहन चालवत असल्याची माहिती आहे.

अपघातानंतर डंपर्स बदल

वाहतूक करणारे डंपर्स हे जुनाट असून काही डंपर्सची वाहतुकीसाठी लागणारी पूर्ण कागदपत्रे नसल्याने अपघात घडल्यास डंपर बदलले जात असून कागदपत्र पूर्ण असणाऱ्या डंपरला नोंद होणाऱ्या गुन्ह्यात समाविष्ट केले जात असल्याचा गंभीर प्रकारही समोर आला आहे. या एकूण अपघातात गुजरात पासिंग असलेल्या डंपरने अपघात केला, मात्र त्याच्या जागेवर महाराष्ट्र पासिंगचे डंपर पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यात नोंदविल्याने आश्चर्य व्यक्त होत असून याबाबतही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे मागणी होत आहे.

Nandurbar Accident
Nandurbar Accident News : पिक-अप नदीत पडून 2 ठार, तर 3 गंभीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.