Nandurbar Soybean Crop Crisis: सोयाबीनवर ‘येलो मोझक’चा प्रादुर्भाव! 1 हजार 875 हेक्टरचे नुकसान; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Latest Agriculture News : समाधानकारक पावसाने पिकाची वाढ चांगली झालेली असताना सोयाबीनच्या शेंगा मात्र जेमतेमच लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटण्याची भीती आहे.
Yellow soybean crop in the field of farmer Sudhakar Pimpre
Yellow soybean crop in the field of farmer Sudhakar Pimpreesakal
Updated on

तळोदा : सोयाबीन पिकावर ‘येलो मोझक’ पसरल्याने तालुक्यातील तब्बल एक हजार ८७५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केलेल्या उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. समाधानकारक पावसाने पिकाची वाढ चांगली झालेली असताना सोयाबीनच्या शेंगा मात्र जेमतेमच लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटण्याची भीती आहे. (Infestation of Yellow Mozak on soybeans)

तळोदा तालुक्यात खरिपात कापूस, सोयाबीन, तांदूळ, तूर, मूग, ज्वारी, उडीद पिकांची लागवड केली जाते. त्यात सर्वाधिक लागवड कापसाची केली जाते. त्याखालोखाल सोयाबीनला पसंती दिली जाते. त्यामुळे यंदा एक हजार ८७५ हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. यंदा जूनपासून जोरदार पाऊस झाल्याने पिकांची वाढही चांगली झाली.

मात्र, चांगली वाढ झालेल्या सोयाबीन पिकावर ‘येलो मोझक’ पसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ‘येलो मोझक’मुळे सोयाबीनचे पीक पिवळे पडले आहे. ‘येलो मोझक’मुळे सर्वत्र पेरणी केलेले सोयाबीन पीक पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. (latest marathi news)

Yellow soybean crop in the field of farmer Sudhakar Pimpre
Nashik Maize Crop Crisis : बुरशी प्रादुर्भावामुळे मका पिक करपले! कसमादे पट्ट्यातील बळीराजा हतबल; भरपाईची मागणी

तालुक्यात तळोदा, काजीपूर, चिनोदा, मोड, आमलाड, दलेलपूर, तलावडी, रोझवा शिवारात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र ‘येलो मोझक’मुळे पिके पिवळी पडल्याने शेतकऱ्यांनी चिंता वाढली आहे.

"यंदा सहा एकरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली आहे. मात्र सर्व पीक पिवळे पडले आहे. त्यात सोयाबीन शेंगा जेमतेमच लागल्या आहेत. त्यामुळे उत्पादन घटणार असल्याने खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे."- सुधाकर पिंपरे, शेतकरी, तळोदा

"सोयाबीन पिकावर यंदा ‘येलो मोझक’चा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे सर्व पीक पिवळे पडले असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे."- दीपक सूर्यवंशी, कृषितज्ज्ञ, तळोदा

Yellow soybean crop in the field of farmer Sudhakar Pimpre
Agriculture Crop Crisis : साहेब, ही हमीभाव की कमीभाव योजना! शेतकऱ्याचा सरकारला सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.