Nandurbar News : मोड येथील रसाळ गुळाची जिलबी खातेय भाव! सकाळपासूनच ग्रामस्थांची होते गर्दी; विशेष मसाल्यामुळे वेगळीच चव

Latest Food News : मोड येथे हॉटेल व्यावसायिकांडे मिळणारी गुळाची जिलबी. अगदी लालसर आणि रसाळ जिलबी हॉटेलवर पाहिली की खवय्यांना मोह आवरत नाही.
jaggery jalebi
jaggery jalebiesakal
Updated on

बोरद : माणसाला कुठल्याही पदार्थाची चव तत्काळ कळते आणि चविष्ट पदार्थांचा मोह बाळगते. कुठलाही पदार्थ जिभेवर ठेवला की त्या पदार्थाची चव लगेच जीभ ओळखते. त्या पदार्थांची चव चांगली असेल, तर तो पदार्थ नियमित खाण्यासाठी माणूस प्रयत्नही करतो. (Nandurbar Juicy Jaggery Jilebi at Mod famous)

असा पदार्थ म्हणजे मोड येथे हॉटेल व्यावसायिकांडे मिळणारी गुळाची जिलबी. अगदी लालसर आणि रसाळ जिलबी हॉटेलवर पाहिली की खवय्यांना मोह आवरत नाही. तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात असणाऱ्या मोड येथे दोन हॉटेल आहेत. दोघांकडे मिळणारे पदार्थही सारखेच आहेत. त्यामध्ये शेव चिवडा, कचोरी, मिसळ, भजी आणि जिलबीचा समावेश आहे. या सर्वांमध्ये भाव खाऊन जाते ती जिलबी.

जिलबी चांगली बनविण्यासाठी दोन्ही व्यावसायिक प्रयत्न करतात. चांगल्यातली चांगली रसाळ जिलबी बनवण्यासाठी प्रयत्न केला जातो. सकाळी आठपासूनच या दोन्ही ठिकाणी कचोरीबरोबरच जिलबीही विक्रीसाठी उपलब्ध होते. शेजारच्या खेड्यापाड्यांवरूनही ग्रामस्थ जिलबीचा आस्वाद घेण्यासाठी येथे येतात.

जिलबी बनवण्यासाठी उच्च प्रतीचा गूळ, साखर, तळणासाठी सोयाबीन तेल तसेच उच्च प्रतीचा मैदा वापरला जातो. या मिश्रणात इलायची, काळी मिरी यांपासून बनविलेला विशेष मसाला वापरला जातो. ज्यामुळे येथील जिलबीला वेगळीच चव येते.

रात्रीच मैद्यावर प्रक्रिया करून सकाळी दोन्ही व्यावसायिकांकडे जिलबी काढली जाते. गुळाच्या किंवा साखरेच्या पाकात ही जिलबी टाकली जाते आणि तेथून जेव्हा ती काढली जाते तेव्हा उभ्या असलेल्या ग्राहकांच्या तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहत नाही.

ओंकार मराठे यांनी सांगितले, की माझे छोटेसे हॉटेल असून, येथे ग्राहकांना ताजा व उच्च प्रतीचा माल दिला जातो. पदार्थांत कुठलीही तडजोड केली जात नाही. जिलबीसाठी लागणारे साहित्य तसेच इतर साहित्य चांगल्या ठिकाणाहून मागविले जाते. कारागिरांना स्वच्छतेबाबत सूचना असतात. ऑर्डरनुसार जिलबी बनवली जाते. (latest marathi news)

jaggery jalebi
Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कडधान्यांचे पौष्टिक ब्रेड रोल, नोट करा रेसिपी

माहेरवाशीणींचा पाहुणचार

आजूबाजूच्या खेड्यात लग्न झालेल्या मुली सासरी गेलेल्या असतात. त्या सणासुदीला माहेरी आल्यावर आई-वडील आपल्या मुलींना, नातवंडांना आवर्जून पाहुणचारात येथील जिलबी खाऊ घालतात आणि मुलींही ती जिलबी आई-वडिलांचे प्रेम ओतल्यागत भासते. अगदी प्रेमाने आणि मनसोक्त त्या जिलबीचा आस्वाद घेतात.

परराज्यातही मागणी

मोड, बोरद तसेच शेजारील इतर गावांतून बरेचसे नातेवाईक गुजरात तसेच मध्य प्रदेशात आहेत. त्यामुळे त्या राज्यातून येणारे नागरिकही मोठ्या प्रमाणात मोड येथून जिलबी तसेच शेव चिवडा बांधून देतात, ते म्हणतात की, येथील शेव चिवडा तसेच जिलबीला एक वेगळाच स्वाद आहे जो आम्हाला येथे आकर्षित करतो.

jaggery jalebi
Navratri Recipe: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बनवा कुरकुरीत उपवासाचे रोल, नोट करा रेसिपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.