Ladki Bahin Yojana: अर्जासाठी अतिरिक्त तरुणांची मानधन तत्त्वावर नियुक्ती! बामखेडा ग्रामपंचायतीने महिलांची गैरसोय केली दूर

Nandurbar News : गावातील अंगणवाडीसेविकांसोबतच ग्रामपंचायतीमार्फत अतिरिक्त तरुणांना मानधन तत्त्वावर नियुक्त करून गावातच ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा करून दिल्याने महिला वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

शहादा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी सर्वत्र शासकीय कार्यालयांत यात्रेचे स्वरूप आले आहे. सेवा केंद्रातही मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे; परंतु बामखेडा (ता. शहादा) येथील ग्रामपंचायतीने गावातील महिलांची या योजनेत अर्ज दाखल करताना गैरसोय होऊ नये, आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून गावातील अंगणवाडीसेविकांसोबतच ग्रामपंचायतीमार्फत अतिरिक्त तरुणांना मानधन तत्त्वावर नियुक्त करून गावातच ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा करून दिल्याने महिला वर्गात समाधान व्यक्त होत आहे. (Nandurbar ladki bahin yojana Recruitment of additional youth on emolument basis)

राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज समाविष्ट करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. कधी सर्व्हरची अडचण, तर कधी कागदपत्रांची अडचण यामुळे थेट तालुकास्तरावर जावे लागते. या वेळी आर्थिक भुर्दंड तर बसतोच, शिवाय वेळही वाया जातो.

शासनाची ही योजना चांगली आहे; परंतु काही ठिकाणी महिलांना कागदपत्रे तयार करताना त्रासदायकही ठरत आहे. आपल्या गावातील महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये यासाठी अंगणवाडीसेविकांसोबत महिलांसाठी गावातच ग्रामपंचायतीने अर्ज भरण्याची सोय केली असून, यासाठी गावातील तरुणांना ग्रामपंचायतीने मानधन तत्त्वावर नियुक्त केले आहे. (latest marathi news)

Ladki Bahin Yojana
Ladki bahin Yojana : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ‘बहीण’ अधिकच ‘लाडकी’; दहा हजारांवर महिलांची नोंदणी पूर्ण

त्यांच्यामार्फत ऑनलाइन व ऑफलाइन फॉर्म भरून घेण्याचे आवाहन सरपंच मनोज चौधरी व ग्रामपंचायतीने केले आहे. या योजनेत अर्ज समाविष्ट करण्यासाठी अपडेट असलेले आधारकार्ड, मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला, हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचे छायाचित्र तसेच अन्य कागदपत्रे घेऊन महिलांनी स्वतः उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे. ग्रामीण भागात बहुतांश महिला निरक्षर असल्याने त्यांची अर्ज भरताना व कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक होते. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

"महिलांसाठी असलेल्या राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेपासून गावातील पात्र महिला वंचित राहू नयेत, तसेच त्यांना अर्ज भरणे सोयीस्कर व्हावे, गैरसोय होऊ नये. तालुक्याच्या ठिकाणी जावे लागू नये, आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी ग्रामपंचायतीने गावातच अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त तरुणांची मानधन तत्त्वावर नियुक्ती केली आहे. महिलांनी याच्या लाभ घ्यावा." - मनोज चौधरी, सरपंच, बामखेडा

Ladki Bahin Yojana
Nandurbar News : जिल्ह्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत; आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नांना यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.