Nandurbar News : येथील लोकन्यायालयात २१७ प्रकरणे निकाली होऊन, त्यात ९० लाख ५४ हजार ८३० रुपये वसूल करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार व शहादा तालुका विधी सेवा प्राधिकरण तसेच शहादा वकील संघ यांच्यातर्फे शहादा येथे रविवारी (ता. ३) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणात लोकन्यायालय झाले. (Nandurbar Lok Adalat in Shahada 217 cases settled 90 lakh recovered)
या वेळी तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. दातीर यांनी सांगितले, की लोकांचा वेळ व पैसा वाचावा म्हणून शासनामार्फत जिल्हा व तालुकास्तरावर न्यायालयीन वादविवाद.
खटले आपसात समजुतीने निकाली निघावेत म्हणून शिबिराचे आयोजन करण्यात येते. लोकांनी आपले वादविवाद, खटले आपसांत समजुतीने मिटवून आपला वेळ व पैसा वाचवावा. लोकांनी जास्तीत जास्त खटले सामंजस्याने मिटविण्याचे आवाहन केले.
लोकन्यायालयात न्यायालयीन एक हजार ६२ व दाखलपूर्व त्यात बँका व ग्रामपंचायतीमधील घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीदारांची चार हजार ८८२ अशी एकूण पाच हजार ९४४ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यांपैकी न्यायालयीन ५२ प्रकरणे, तर दाखलपूर्व १६५ प्रकरणे अशी एकूण २१७ प्रकरणे निकाली निघाली. (latest marathi news)
यात ९० लाख ५४ हजार ८३० रुपये वसूल करण्यात आले. यासाठी चार पॅनलची नेमणूक करण्यात आली होती. यात जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एस. दातीर यांच्यासोबत ॲड. एम. एस. साळवे, दिवाणी वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश बी. एन. आरबाड यांच्यासोबत ॲड. व्ही. सी. पथारिया.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. पाटील यांच्यासोबत ॲड. आर. आर. रोकडे, न्यायमूर्ती श्रीमती एस. आर. पाटील यांच्यासोबत ॲड. राजकन्या पाटील असे एकूण चार पॅनल नेमण्यात आले होते. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी अधीक्षक विनायक पाडवी, सहाय्यक अधीक्षक एस. व्ही. जवंजलकर, वरिष्ठ लिपिक विलास सी. सूर्यवंशी, एन. एस. मोहिते, स्टेनो एम. टी. घुगे, एम. बी. भामरे, स्नेहल डी. जैन यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.