Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. २५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी १९ उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण १९ उमेदवारांनी ३१ उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ७८ अर्जांची विक्री झाली. दरम्यान, शुक्रवारी (ता. २६) दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency 31 nominations of 19 persons filed on last day)
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला १८ एप्रिलपासून सुरवात झाली आहे. १८ ते २५ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज खरेदी व दाखल करण्याची मुदत होती. आतापर्यंत या मतदारसंघात ७७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी १९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यात सुशीलकुमार जहाँगीर पावरा यांनी अपक्ष, हेमलता कागडा पाडवी यांनी काँग्रेस पक्षातर्फे दोन, बहुजन मुक्ती पार्टीचे रोहिदास गेमजी वळवी यांनी दोन, भारतीय आदिवासी पार्टीचे रवींद्र रणजित वळवी यांनी दोन, बहुजन समाज पार्टीचे आनंदा सुकलाल कोळी यांनी दोन, जालमसिंग सुतूम पवार यांनी अपक्ष. (latest marathi news)
काँग्रेस पक्षातर्फे ॲड. गोवाल कागडा पाडवी यांनी दोन, तर एक अपक्ष, ॲड. के. सी. पाडवी यांनी एक अपक्ष, वंचित बहुजन आघाडीचे हेमंत मन्साराम कोळी यांनी दोन, अलीबाबा रशीद तडवी यांनी अपक्ष, अपक्ष मोठाजी तुकाराम ठाकरे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, २२ एप्रिलला भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी प्रत्येकी तीन उमेदवारी अर्ज, तर काँग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी यांनी आपले नामांकन दाखल केले होते. २३ एप्रिलला गोपाळ भंडारी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गुरुवारी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)च्या निर्मला कागडा वसावे, अपक्ष दीपककुमार मधुकर शिरसाठ, गीतांजली शशिकांत कोळी, डोंगर जिभाऊ बहिरम यांनी उमेदवारी दाखल केली आहे. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १९ उमेदवारांनी ३१ नामांकनपत्रे दाखल केली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.