Nandurbar Lok Sabha Constituency : भाजपकडे वजनदार नेत्यांचे बळ; कॉंग्रेसकडे सामान्य कार्यकर्त्यांची ताकद

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी मुख्य लढत असलेले भाजप व कॉंग्रेस पक्षाने उमेदवारांची नावे जाहिर करण्यात महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे.
Dr. Heena Gavit & Adv. Goval Padavi
Dr. Heena Gavit & Adv. Goval Padaviesakal
Updated on

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी मुख्य लढत असलेले भाजप व कॉंग्रेस पक्षाने उमेदवारांची नावे जाहिर करण्यात महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीतील पक्ष व उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीचा विचार केल्यास भाजपकडे आजी-माजी मंत्री,आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे वजनदार नेत्यांचे बळ आहे.

तर कॉंग्रेसकडे विधानसभेतील दोन आमदार व काही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ताकद असल्याचे चित्र आहे. तरीही निवडणूक अत्यंत चुरशीची व राज्यात लक्षवेधी ठरणार हे मात्र निश्‍चित झाले आहे. कधीकाळी कॉंग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आता मोठी खिंडार पडली आहे. भाजपने हा गड भेदून काढत आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

कॉंग्रेसमधील अनेक नेतेही भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये सद्यस्थितीत विधानसभेचे दोन आमदार वगळता वजनदार नेते कोणीही नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य, सरपंच आदी सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांवरच निवडणुकीची भिस्त आहे. एकीकडे एक दशकपूर्ण केलेले खासदार भाजपचे उमेदवार आहेत.

तर राजकारणात नवखा मात्र उच्चशिक्षित तरूण उमेदवार कॉंग्रेसने दिला आहे. उमेदवारांना राजकीय वारसा आहे. मात्र सध्याच्या राजकारणात राजकीय गणित विस्कटले आहे. मागील निवडणूकीत नंदुरबार लोकसभेत कॉंग्रेसचे ॲड. के.सी.पाडवी यांना शिरपूरचे माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल, नंदुरबारचे नेते चंद्रकांत रघुवंशी.

तळोद्याचे माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, माजी खासदार (कै) माणिकराव गावित, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, भरत गावित, विद्यमान आमदार शिरीषकुमार नाईक यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह सरपंच व कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. त्यामुळे ॲड. पाडवी यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना अत्यंत जोरदार लढत दिली होती. (nandurbar political news)

Dr. Heena Gavit & Adv. Goval Padavi
Sangli Loksabha: सांगलीत मविआचा उमेदवार सेनेचा असणार की काँग्रेसचा? उद्या होणार फैसला

मात्र यावेळचे चित्र पाहता कॉंग्रेसमधील काही मान्यवर नेत्यांनी पक्षांतर केले आहे. आमदार अमरिशभाई पटेल , तळोद्याचे माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी, जि.प.माजी अध्यक्ष भरत गावित हे भाजपमध्ये गेले आहेत. तर माणिकराव गावित यांचे निधन झाले. ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक वयोवृध्द झाल्याने ते बाहेर पडू शकत नाहीत.

तर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही कॉंग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने कॉंग्रेसचे वजनदार नेते इतर पक्षात गेले. त्यामुळे यंदाचा निवडणुकीत कॉंग्रेसकडे स्वतः माजी मंत्री तथा आमदार के.सी.पाडवी, नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक, दिलीप नाईक, माजी खासदार बापू चौरे.

माजी आमदार सुर्यवंशी हे स्थानिक नेते वगळता केवळ जिल्हा परिषदेचे काही सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच व काही सामान्य कार्यकर्त्यांची ताकद शिल्लक राहिली आहे. त्यांचावरच कॉग्रेस पक्षाची निवडणूकीची भिस्त आहे. दुसरीकडे भाजपकडे वजनदार नेत्यांची मोठी फळी तयार झाली आहे. स्वत: उमेदवार डॉ.हिना गावित यांचे स्वतंत्र वलय आहे.

त्यांचे वडील मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी आमदार शरद गावित हे त्यांच्या कुटुंबातील राजकीय नेते आहेत. तर पक्षीय बळ म्हटल्यावर शिरपूरचे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, धुळे जि.प.माजी अध्यक्ष तुषार रंधे, तळोद्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी.

Dr. Heena Gavit & Adv. Goval Padavi
Sangli Loksabha Constituency : जयंत पाटील यांच्या मौनाचा अर्थ काय?

आमदार राजेश पाडवी, शिवसेनेत (शिंदे गट) नुकतेच प्रवेश केलेले आमदार आमशा पाडवी. भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, डॉ. शशिकांत वाणी, नागेश पाडवी, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, युवा नेते डॉ. विक्रांत मोरे, साक्रीतून जि.प.चे माजी अध्यक्ष शिवाजी दहीते, ॲड. संभाजी पगारे हे वजनदार नेते आहेत.

त्यांचासोबतच मित्र पक्ष म्हणून विचार केल्यास शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे आदींचे बळ सोबत आहे. भाजप व कॉंग्रेस पक्षाच्या राजकीय वजनदार नेत्यांच्या संख्येचा विचार केल्यास भाजप नक्कीच वरचढ आहे तर कॉंग्रेसकडे वजनदार नेते कमी आहेत. त्यामुळे निवडणुक अत्यंत चुरशीची होणार आहे.

Dr. Heena Gavit & Adv. Goval Padavi
Loksabha Election 2024 : ‘ईव्हीएम’शिवाय भाजपला सत्ता कठीण’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.