Nandurbar Lok Sabha Election 2024 Result : नंदुरबारमध्ये 10 वर्षांनंतर कॉँग्रेसने भाजपला रोखले; डॉ. हीना गावित यांची हॅट्‌ट्रिक हुकली

Lok Sabha Election : कॉँग्रेसचे उमेदवार व नवा चेहरा असलेल्या ॲड. गोवाल पाडवी यांनी रोखले. ॲड. पाडवी यांनी १ लाख ५९ हजार ३२ मताधिक्य घेत विजय मिळविला आहे.
Adv. Gowal Padavi was picked up by the workers and cheered.
Adv. Gowal Padavi was picked up by the workers and cheered.esakal
Updated on

Nandurbar Lok Sabha Election 2024 Result : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या दहा वर्षांच्या यशस्वी घोडदौडीनंतर हॅट्‌ट्रिक करू पाहणाऱ्या खासदार डॉ. हीना गावित यांना कॉँग्रेसचे उमेदवार व नवा चेहरा असलेल्या ॲड. गोवाल पाडवी यांनी रोखले. ॲड. पाडवी यांनी १ लाख ५९ हजार ३२ मताधिक्य घेत विजय मिळविला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या मोदी लाटेमुळे उच्च शिक्षित डॉ. हीना गावित यांना पसंती देत टॉपटेन खासदार स्व. माणिकराव गावित यांचा पराभव करून लाखावर मताधिक्यांनी निवडून दिले होते. (Congress candidate and new face win election by Gowaal Padavi )

त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे ॲड. के. सी. पाडवी यांचा ९५ हजार पाचशे मतांनी पराभूत करून दुसऱ्यांदाही निवडून आल्या होत्या. त्यामुळे दहा वर्षांत त्यांना राजकीय अनुभव भक्कम झाला. त्यानंतर केंद्र शासनाचा अनेक योजना त्यांनी मतदारसंघात राबविल्या. त्यामुळे त्यांचा थेट जनसंपर्क वाढला होता. यामुळे भाजपने तिसऱ्यांदा डॉ. गावित यांना उमेदवारी जाहीर करून त्यांना हॅट्‌ट्रिक साधण्याची संधी दिली.

स्वतः केलेले विकास कामे, वडील डॉ. विजयकुमार गावित मंत्री असल्याने त्यांनी केलेली विकास कामे यांचा नक्कीच त्यांना लाभ होईल, असा विश्‍वास होता. त्यातच कॉँग्रेसने नवा चेहरा म्हणून ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे डॉ. गावित यांच्या तुलनेत पाडवी अत्यंत कमकुवत स्पर्धक भाजप मानत होता. ज्यांना खरोखरच मतदारसंघात कोणी ओळखत नाही, त्यांचे नाव माहीत नाही, असा नवखा उमेदवार डॉ. गावित यांच्या समोर असल्याने निवडणूक एकतर्फी होईल, असे भाजप व डॉ. गावित कुटुंबीयांना वाटू लागले. (latest marathi news)

Adv. Gowal Padavi was picked up by the workers and cheered.
Nashik Lok Sabha Election 2024 Result : दिंडोरीच्या अगोदर नाशिकच्या उमेदवाराने उधळला गुलाल

मात्र शेवटच्या १५ दिवसांत कॉँग्रेस उमेदवाराला भाजप व डॉ. गावित कुटुंबीयांवर नाराज असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बळ मिळाले. त्यानंतर प्रियांका गांधी यांची सभा जोरदार झाली. या सभेने आदिवासींशी कॉँग्रेसचे व गांधी घराण्याचे असलेले नाते अधोरेखित करीत मतदारांचे मन जिंकले. त्याचाही प्रभाव झाला अन् वातावरण फिरले. सोपी वाटणारी निवडणूक भाजपला शेवटी अटीतटीची ठरली.

गावित कुटुंबाने कामे केली असली तरी त्यांचा एकाच घरात असलेले सर्वच राजकीय पदे यांमुळे इतर नेते पदाधिकारी व विरोधकांच्या नाराजीमुळे जनतेचा दरबारात निवडणूक गेली. जनतेने कॉंग्रेस उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांना झुकते माप दिले. मतदान मोठ्या प्रमाणात झाले. त्याचाही फायदा कॉँग्रेसला झाला. मतदारांनी नवा चेहरा व कोरी पाटील असलेल्या ॲड. गोवाल पाडवी यांना पहिल्या फेरीपासूनच आघाडी देत एक लाख ५९ हजार १२० मतांनी विजयी करून आपला खासदार म्हणून दिल्लीला जाण्याची संधी दिली.

Adv. Gowal Padavi was picked up by the workers and cheered.
Nandurbar Lok Sabha Election 2024 : इच्छुकांमध्ये कही खुशी, कही गम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.