Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबारला प्रथमच 11 उमेदवार निवडणूक रिंगणात

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात स्वातंत्र्यानंतर प्रथमच ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Constituency esakal
Updated on

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात स्वातंत्र्यानंतर प्रथमच ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ७५ वर्षांतील निवडणुकीतील हा सर्वाधिक उमेदवारांचा आकडा आहे. खरी लढत भाजप-काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये रंगत आली असली तरी निवडणूक रिंगणात इतरांनीही आजपर्यंत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency)

मात्र ते केवळ मत विभाजणास कारणीभूत ठरले असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही मुख्य लढत असलेल्या भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांसाठी इतर उमेदवार डोकेदुखी ठरणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येचा विचार केल्यास कधी नव्हे.

एवढे उमेदवार यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीचा विचार केल्यास १९८९ मध्ये सात, १९९१ मध्ये सहा, तर १९९६ मध्ये नऊ उमेदवार रिंगणात होते. इतर निवडणुकांमध्ये चारपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेच नसल्याचे गेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतील उमेदवारांची संख्या ही राजकारणात येणाऱ्या इच्छुकांची अपेक्षा वाढवणारी आहे.

नंदुरबार मतदारसंघात आतापर्यंत भाजप-काँग्रेसमध्ये लढती झाल्या असल्या, तरी अपक्ष, माकप, जनता दल, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात असत. त्या वेळी त्या पक्षांची फारशी ताकद या मतदारसंघात नव्हती. मोठे पक्ष म्हणून भाजप-काँग्रेसमध्येच लढत होत असे. मात्र इतर उमेदवारांनाही अनेकदा चांगले मते मिळाली आहेत. (Latest Marathi News)

Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Drought News : पाण्याची पातळी खोल; बोअरवेल्स कोरडेठाक

जे नेहमी भाजपसाठी डोकेदुखी ठरत आले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीतील उमेदवार जास्त मते घेणार नाहीत, तरी आमने-सामने लढणाऱ्या भाजप-काँग्रेसव्यतिरिक्त इतर नऊ उमेदवार साधारण एक लाख मतांचे धनी आहेत. त्यामुळे जास्त उमेदवार हे मुख्य उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत.

कोळी समाजाचे चार उमेदवार रिंगणात

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात शहादा, नंदुरबार, शिरपूर व साक्री परिसरात कोळी समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कोळी समाजाचे चार उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघाचा विचार करता कोळी समाजाचा मतदारांचा आकडा एक लाखावर आहे. त्यामुळे दर निवडणुकीतील कोळी समाजातील एक उमेदवार असतोच.

मात्र या वेळी चार उमेदवार रिंगणात आहेत. त्यात बहुजन समाज पक्षाचे आनंदा सुकलाल कोळी, वंचित बहुजन आघाडीचे हेमंत मन्साराम कोळी, अपक्ष उमेदवार गीतांजली कोळी, दीपककुमार शिरसाठ यांचा समावेश आहे.

Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Drought News : सातपुड्याच्या दुर्गम भागात दुष्काळाचे सावट

आदिवासी मतांचे विभाजन

भारतीय आदिवासी पक्षाचे रवींद्र रणजित वळवी शासकीय सेवेत होते. बहुजन मुक्ती पक्षाचे रोहिदास वळवी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत होते. सुशीलकुमार पावरा हेही धडगाव तालुक्यात तरुणांमध्ये मिसळणारे आहेत. या तिन्ही उमेदवारांमुळे आदिवासी मतांचे विभाजन होईल. हे तिन्ही उमेदवार साधारण ५० हजार मते खेचून घेऊ शकतात. त्यामुळे हे उमेदवार मुख्य उमेदवारांसाठी धोकदायक ठरू शकतात, अशी चर्चा आहे.

जळगावात १४, रावेर मतदारसंघात २४ उमेदवार

जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांत सोमवारी (ता. २९) उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघातून सहा, तर रावेर लोकसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांनी माघार घेतली. आता जळगाव लोकसभा मतदारसंघात एका जागेसाठी १४, रावेर लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवार रिंगणात आहेत.

दुपारी तीननंतर रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. २६ एप्रिलला छाननीत जळगावमध्ये चार, तर रावेर लोकसभा मतदारसंघात दोन, असे एकूण सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. जळगावात २०, तर रावेरमध्ये २९ उमेदवार रिंगणात होते. अपक्षांनी माघार घ्यावी, यासाठी पक्षाचे पदाधिकारी दोन दिवसांपासून सल्लामसलत करीत होते. असे असतानाही दोन्ही मतदारसंघ मिळून केवळ ११ उमेदवारांनी माघार घेतली.

Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Loksabha Election : नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकणारच; काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके यांचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.