Nandurbar Lok Sabha Constituency : जागा वाटपाचा तिढा सुटेना, मित्र पक्षाचे पदाधिकारी कामाला लागेना

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप व कॉंग्रेसचे उमेदवार जाहीर झाले असले तरी स्थानिक स्तरावर मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागलेले नाहीत.
Nandurbar Lok Sabha 2024
Nandurbar Lok Sabha 2024Esakal
Updated on

Nandubar News : सध्या लोकसभा निवडणुकीचा जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप व कॉंग्रेसचे उमेदवार जाहीर झाले असले तरी स्थानिक स्तरावर मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागलेले नाहीत. आमच्या पक्षाची मागणी मान्य केली तर आम्हाला पक्षादेश मिळेल ते काम करू, तोपर्यंत कुठेच नाही, अशी भूमिका येथील महायुती व महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.(Nandurbar Lok Sabha Constituency)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपच्या डॉ. हिना गावित यांना उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे. त्या पाठोपाठ कॉंग्रेसनेही ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी घोषित केली आहे. जिल्ह्यातील राजकिय समीकरणांचा विचार केल्यास भाजप महायुतीत शिवसेना (शिंदे गट).

राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) आरपीआय (आठवले गट) हे प्रमुख पक्ष आहेत तर कॉंग्रेस महाविकास आघाडीत कॉंग्रेससोबत शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गट व वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश आहे. या दोन्ही महायुती व आघाडीचे उमेदवार घोषित करण्यात नंदुरबार लोकसभा आघाडीवर आहे.

त्यासाठी महायुती व महाविकास आघाडीतर्फे नियोजन बैठका व चर्चा प्राथमिक स्तरावर सुरू झाल्या आहेत. मात्र या बैठकांमध्ये उमेदवार असलेल्या पक्षाचेच पदाधिकारी व काही मित्रपक्षाचे पदाधिकारी दिसून येत आहेत. काही मित्र पक्षाचे पदाधिकारी अद्यापही तटस्थ असल्याचे चित्र आहे. नुकतीच भाजप महायुतीची बैठक मंत्री डॉ. विजयकुमार गावित व डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत झाली. (latest marathi news)

Nandurbar Lok Sabha 2024
Loksabha Election 2024 : ‘आमचं ठरलंय’, तुतारी हाती घेणार ; जयसिंह मोहिते पाटील,भाजपविरोधात फुंकले रणशिंग

त्या बैठकीस सर्वच महायुतीतील घटक मित्र पक्षांच्या जिल्हा प्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या बैठकीस शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी डॉ. हिना गावित यांच्या उमेदवारीस उघड विरोध केला असला तरी मित्र पक्ष म्हणून बैठकीस उपस्थित राहत आपली भूमिका स्पष्ट केली व नाराजीही बोलून दाखविली. मात्र पक्षाचे अद्याप काहीही आदेश नाहीत.

पक्षीय स्तरावर राज्यातील जागा वाटपाचा तिढा निकाली निघाला नाही म्हणून त्यांनी पक्षाचे आदेश येतील तसे आम्ही काम करू असे सांगितल्याचे कळते, तर दुसरा मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) चेही जागा वाटपाबाबतचे सुत्र स्पष्ट न झाल्याने स्थानिक जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस जाणेही टाळले आहे.

तर रिपब्लिकन पक्षाचा बाबतीतही तेच आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेत थेट जागा वाटपात सन्मानपूर्वक न्याय दिला जात नाही, तोपर्यंत आरपीआय (आठवले गटाचे) पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीच्या बैठका, प्रचाराला जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

Nandurbar Lok Sabha 2024
Sangli Loksabha Constituency : चंद्रहार सेनेच्या यादीत,विशाल पाटील दिल्लीत ; सांगलीबाबत वेगवान घडामोडी

कॉंग्रेसचे उमेदवार जाहीर झाले, मात्र उमेदवार किंवा पक्षाकडून मित्र पक्षांची अद्याप बैठकही झाली नाही. मित्र पक्षांशी चर्चा नाही. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) असो की, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार ) गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी हेही तटस्थ आहेत. पक्षीयस्तरावरून आदेश अद्याप कोणत्याही पक्षाने आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले नाहीत.

त्यामागे जागा वाटपाचा तिढा हेच मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत महायुती असो की महाआघाडी असो, या दोन्ही पक्षाच्या उमेदवारासोबत जाण्यास मित्र पक्ष तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुती व महाआघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचा जागा वाटपातील समाधानकारक वाटा मिळण्याची प्रतिक्षा लागली आहे.

Nandurbar Lok Sabha 2024
Sangli Lok Sabha : चंद्रहार यादीत, विशाल दिल्लीत! सांगलीवरुन 'मविआ'त ताण वाढला; शिवसेनेच्या यादीवर काँग्रेसची तीव्र नाराजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.