Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीतर्फे शक्तिप्रदर्शन!
Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी (ता. २५) ॲड. गोवाल के. पाडवी यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी या शक्तिप्रदर्शन रॅलीत सहभागी झाले. शक्तिप्रदर्शन रॅलीवरून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पुन्हा उभारी मिळाल्याचे चित्र दिसून आले. (Nandurbar Lok Sabha Constituency Power demonstration by Maha Vikas Aghadi)
नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवार अंतिम दिवस होता. काँग्रेसचे उमेदवार ॲड. पाडवी यांनी मुहूर्त साधत २२ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी शक्तिप्रदर्शन रॅलीस गुरुवारी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी अकराला शहरातील संजय टाउनहॉलजवळून काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शन रॅलीला सुरवात झाली.
रॅलीत माजी मंत्री आमदार के. सी. पाडवी, काँग्रेसचे निरीक्षक राजाराम गव्हाणे, प्रतिभा शिंदे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी व इतर मित्रपक्षांच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांसह नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक, दिलीप नाईक, शहाद्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील.
जयपाल रावल यांच्यासह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. सुमारे २० हजार कार्यकर्त्यांच्या या शक्तिप्रदर्शन रॅलीने शहराचे लक्ष वेधून घेतले होते. काँग्रेस, शिवसेना, माकप व इतर मित्रपक्षांच्या झेंड्यासह ढोल-ताशे, डीजेच्या तालावर नाचत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे शिबली नृत्य करीत कार्यकर्त्यांनी जल्लोषपूर्ण वातावरणात शक्तिप्रदर्शन केले. आजच्या या शक्तिप्रदर्शनावरून काँग्रेसला पुन्हा उभारी व झळाळी मिळाल्याचे चित्र दिसून आले. (latest marathi news)
उमेदवाराच्या हातात संविधान
शक्तिप्रदर्शन रॅलीदरम्यान उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांच्या हातात संविधानाची प्रत होती. बैलगाडीवरून त्यांनी शक्तिप्रदर्शन रॅलीत सहभाग घेतला. दरम्यान, शक्ति प्रदर्शन रॅली सुरू असताना आमदार कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजा करीत जल्लोष केला. यावेळी आमदार कार्यालयाच्या इमारतीवरून माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी रॅली पाहत होते.
माझी जबाबदारी वाढली ः अॅड. गोवाल पाडवी
माझा उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी सर्व महाविकास आघाडीचे नंदुरबार मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझी जनता रणरणत्या उन्हात मोठ्या संख्येने उपस्थित होती. काँग्रेस व महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मी भारावून गेलो आहे. शिवाय माझी जबाबदारीही वाढली आहे. तुमचे प्रेम व आशीर्वादाने मला जे बळ मिळाले त्यातून माझ्यात स्फूर्ती संचारली आहे. ूरर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.