Nandurbar Lok Sabha: ॲड. पाडवी यांना माणिकराव गावितांनंतर सर्वाधिक मताधिक्य! ‘रेकॉर्ड ब्रेक’ करण्यासाठी 10 हजारांचे मताधिक्य कमी

Lok Sabha Election 2024 Result : गोवाल पाडवी हेही एक लाख ५९ हजार १२० एवढे सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्याचे रेकॉर्ड झाले आहे.
Adv. Goval Padvi & Manikrao Gavit
Adv. Goval Padvi & Manikrao Gavitesakal
Updated on

Nandurbar Lok Sabha : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर काँग्रेसचे तत्कालीन खासदार (कै.) माणिकराव गावित यांनी सतत लाखात मताधिक्य मिळवीत आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली होती. त्यांच्यानंतर नवनिर्वाचित खासदार म्हणून विजयी झालेले ॲड. गोवाल पाडवी हेही एक लाख ५९ हजार १२० एवढे सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्याचे रेकॉर्ड झाले आहे. त्यांना माणिकराव गावित यांचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी पुन्हा दहा हजारांचे मताधिक्य आवश्‍यक होते. (Nandurbar Lok Sabha election 2024 Adv goval Padvi highest votes after Manikrao Gavit)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात १९८० पासूनचा विचार केल्यास अपवाद काही वर्षे वगळता माणिकराव गावित यांनी लाखातच मताधिक्य मिळवीत आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली होती. त्यांना पराभूत करून २०१४ मध्ये भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी एक लाख तीन हजारांचे मताधिक्य मिळविले होते.

मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने गड राखला खरा, मात्र ॲड. गोवाल पाडवी यांनी मताधिक्याचाही उच्चांक गाठला आहे. कदाचित पुढील निवडणुकीपर्यंत पाच वर्षे चांगले काम केले तर ते माणिकराव गावित यांचे १९९१ मधील एक लाख ६८ हजार ८९० मताधिक्याचे रेकॉर्ड ब्रेक करू शकतील.

मात्र आतापर्यंत या मतदारसंघात ना दुसरा खासदार कोणी ‘टप टेन’ ठरले ना त्यांचा मताधिक्याचे रेकॉर्ड ब्रेक करू शकलेले आहेत. सध्याच्या निकालात अजून १० हजारांचे मताधिक्य वाढले असते तर गोवाल पाडवी रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी घोषित झाल्याची नोंद झाली असती.

डॉ. गावितांना तीन लाख मताधिक्याची अपेक्षा

नंदुरबार लोकसभेचे भाजपचे उमेदवार डॉ. हीना गावित यांनी गेल्या दहा वर्षांत आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात केलेली विकासकामे, वाढलेला जनसंपर्क आणि थेट मतदारांशी असलेला संवाद याचा विचार केल्यास व नवखा चेहरा म्हणून काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी त्यांच्यासमोर असलेले दुबळे उमेदवार म्हणूनच्या विश्‍वासामुळे डॉ. गावित यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डॉ. गावित हॅट्‍ट्रिक साधतील आणि तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्‍वास होता. तसे झाले असते तर त्यांनी महाराष्ट्रातील खासदारांचे रेकॉर्ड ब्रेक नक्कीच केले असते. कारण परिस्थितीही तशीच होती. मात्र मतदारांनी सुप्त लाट आणून त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरविले. (latest marathi news)

Adv. Goval Padvi & Manikrao Gavit
Dhule Lok Sabha Election 2024 Result : बागलाण विधानसभेतील कांदाप्रश्नाची धग, अडंरकरंट न जाणणे ठरले घातक!

वर्ष खासदाराचे नाव मिळालेली मते मताधिक्य

१९८० सुरूपसिंग नाईक १,९६,३३५ ९०,७८५

१९८४ माणिकराव गावित २,५४,३४७ १,५७,५१९

१९८९ माणिकराव गावित २,४०,९२५ १,०६,४६६

१९९१ माणिकराव गावित २,८७,२९३ १,६८,८९०

१९९६ माणिकराव गावित २,३६,६०८ ३,३३०९

१९९८-माणिकराव गावित ३,०४,१३४ ६५,७११

१९९९- माणिकराव गावित ३,१८,३३८ १,३०,७७१

२००४ माणिकराव गावित ३,५१,९११ १,०७,६२१

२००९ माणिकराव गावित २,७५,९३६ ४०,८४३

२०१४ डॉ. हीना गावित ५,७९,४८६ १,०६,९०५

२०१९ डॉ. हीना गावित ६,३९,१३६ ९५,६२९

२०२४ ॲड. गोवाल पाडवी ७,४५,९९८ - १,५९,१२०

Adv. Goval Padvi & Manikrao Gavit
Yeola Constituency : भाजपच्या वर्चस्वाला 15 वर्षांनंतर लागला सुरुंग! येवल्यात 2009 नंतर प्रथमच लोकसभेला राष्ट्रवादीला मताधिक्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.