Nandurbar Lok Sabha Election 2024 : इच्छुकांमध्ये कही खुशी, कही गम!

Nandurbar Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाढल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप व काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची यादी मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती.
Nandurbar Lok Sabha Election 2024
Nandurbar Lok Sabha Election 2024esakal
Updated on

Nandurbar Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाढल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप व काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची यादी मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती. मात्र या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केल्याने आता इच्छुकांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे दोन्ही पक्षातील इतर इच्छुक पुढे काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. भाजप व काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने त्या दोन्ही पक्षातील इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम असे चित्र आहे. (Nandurbar Lok Sabha Election 2024)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आत्तापर्यंत अनेक जणांनी उमेदवारी विविध पक्षाच्या माध्यमातून केली असली तरी खरी लढतही भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये समोरासमोर रंगली आहे. आत्ताच्या निवडणुकीतही भाजप व काँग्रेस यांच्यामध्येच खरी लढत रंगणार आहे. भाजपच्या हीना गावित दोन पंचवार्षिकपासून नेतृत्व करीत आहेत.

मात्र भाजपच्या काही जुन्या नेत्यांच्या कुटुंबातील युवा पिढीतील इच्छुकांनीही भाजपतर्फे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी पक्षीयस्तरावर तशा हालचाली ही सुरू केल्या होत्या. पक्षांतर्गत काही मनोमनी असलेला किरकोळ दुरावा, गावित कुटुंबाच्या भोवतीच राजकीय सत्तेचे केंद्र बनल्याने काही पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी याचा फायदा आपल्याला होईल असे म्हणून पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली होती.

अनेक वर्षे भाजपचे काँग्रेस विरुद्ध लढा देणारे उमेदवार कुवरसिंग वळवी यांनी भाजपचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी काँग्रेसच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवाराला आव्हान देत उमेदवारी केली आहे. त्यावेळी भाजपचे फारसे वर्चस्व नसतानाही त्यांनी उमेदवारी करून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवले होते. ते वयोवृद्ध झाले असले तरी त्यांचे पुत्र विशाल वळवी हे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करण्यास इच्छुक होते, त्यांनी मतदार भेटीसह कामालाही सुरवात केली होती. (latest marathi news)

Nandurbar Lok Sabha Election 2024
Loksabha Election : 'या' मतदारसंघात जयंत पाटलांचं मोठं प्राबल्य, कोणाला मिळणार पाटलांची साथ?

पक्षश्रेष्ठींकडेही तशी मागणी केली होती. भाजप आदिवासी आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुहास नटावदकर, नंदुरबार लोकसभेसह विधानसभेसाठी अनेकदा उमेदवारी करीत पक्षाचे अस्तित्व जिल्ह्यात टिकून ठेवले आहे. यावेळेस त्यांची कन्या डॉ. संविधान नटावदकर यांनाही भाजपतर्फे उमेदवारीची अपेक्षा होती. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनीही पक्षश्रेष्ठींकडे आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केल्याची चर्चा होती.

काँग्रेसमध्येही लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या यादीत माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी, ॲड. पद्माकर वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनी नाईक, सीमा वळवी यांची नावे होती. मात्र के. सी. पाडवी हे स्वतः उमेदवारी करणार असल्याने आपल्याला संधी मिळणार नाही, हे हेरून ॲड. पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसतर्फे ॲड. के. सी. पाडवी व रजनी नाईक यांच्या नावावर उमेदवारी बाबत चर्चा होती.

मागील निवडणुकीत ॲड. के. सी. पाडवी यांना संधी दिली होती, मात्र ते पराभूत झाले होते. आता रजनी नाईक यांना संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र के. सी. पाडवी हे स्वतःच उमेदवारीसाठी आग्रही असल्याने नाईक कुटुंबीयांनीही थोडीशी समजदारी घेतली व दोन पावले मागे सरकले. काल रात्री जाहीर झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल यांना उमेदवारी मिळाली.

Nandurbar Lok Sabha Election 2024
Latur loksabha Constituency : नवख्या उमेदवारावर काँग्रेसकडून डाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.