Nandurbar Lok Sabha: वडिलांनंतर मुलगा आजमावतोय आता लोकसभा उमेदवारीतून नशीब! डॉ. गावित व ॲड. पाडवींना राजकीय ‘श्रीगणेशा’ची संधी

Political News : महाराष्ट्रात सर्वांत प्रथम नंदुरबार लोकसभेसाठी भाजप व काँग्रेस या दोन्ही मुख्य पक्षाचे व मुख्य लढती असलेले उमेदवारांचे नावे घोषित झाले आहेत
K. C. Padavi and Gowal Padavi
K. C. Padavi and Gowal Padavi esakal
Updated on

नंदुरबार : काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तीनदा उमेदवारी करून हॅटट्रिक पूर्ण केली आहे. मात्र तिन्ही वेळेस त्यांना अपयश आले. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी सात वेळा नाबाद हॅटट्रिक केल्याचा रेकॉर्ड झाला आहे.

आता त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील अपयशी हॅटट्रिकनंतर मुलगा ॲड. गोवाल पाडवी यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची संधी मिळाली आहे. केवळ संधीच नव्हे, तर थेट राजकीय प्रवेशाचा श्रीगणेशा लोकसभेच्या उमेदवारीने होणे, ही गोवाल यांच्यासाठी नशीब बलवत्तर असल्याचे मानले जात आहे. (Nandurbar Lok Sabha election 2024 Dr heena Gavit Adv gowaal padavi news)

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सर्वांत प्रथम नंदुरबार लोकसभेसाठी भाजप काँग्रेस या दोन्ही मुख्य पक्षाचे व मुख्य लढती असलेले उमेदवारांचे नावे घोषित झाले आहेत. या व्यतिरिक्त अजूनही काहीजण वेगवेगळ्या पक्षातर्फे, तरी काही नवसे-गवसे अपक्ष उमेदवारी करतील.

त्यामुळे मागील इतिहास पाहिला तर प्रत्येक लोकसभा निवडणुकीत किमान पाच उमेदवार रिंगणात उतरलेले दिसतात. त्यामुळे याही वेळेस ती परिस्थिती अपवाद नाही. मात्र खरी लढत भाजप-काँग्रेसमध्येच असणार आहे. यापूर्वीही या दोन्ही पक्षांमध्ये लढती समोरासमोर झाल्या आहेत. अपवाद एक निवडणूक वगळता.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी प्रत्येकाची राजकीय किंवा वंशपंरपरेची पार्श्‍वभूमी पाहावयास मिळते. भाजपचे उमेदवार डॉ. हीना गावित यांना वडिलांची राजकीय पार्श्‍वभूमी आहे. मात्र लोकसभेच्या उमेदवारांची नाही. त्यामुळे त्या स्वतःच त्यांचा कुटुंबातील पहिल्या उच्चशिक्षित डॉक्टर खासदार ठरल्या आहेत.

त्यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित हे विधानसभा निवडणुकीत सर्वप्रथम अपक्ष म्हणून स्वबळावर निवडणूक लढवून राजकारणात आले. त्यांचा राजकीय वारसा डॉ. हीना गावित यांना लाभला. मात्र त्यांनाही थेट लोकसभेची उमेदवारी मिळाली व त्यांचाही राजकीय प्रवेशाचा प्रत्यक्ष श्रीगणेशा २०१४ मध्ये लोकसभेच्या माध्यमातून झाला. तो यशस्वीही ठरला.  (latest marathi news)

K. C. Padavi and Gowal Padavi
Loksabha 2024: 'त्या' दोन्ही जागा काँग्रेसच्या, परत घ्या; राज्यातील नेत्यांची गांधींना हाक

तसेच माजी मंत्री के. सी. पाडवी हेही गेल्या सात वेळेस विधानसभेत निवडून आले आहेत. खासदार माणिकराव गावित व माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्यानंतर विधानसभेतील सात वेळा हॅटट्रिक करणार नंदुरबार लोकसभेतील ते पहिले आमदार ठरले आहेत. यासोबत त्यांनी लोकसभा निवडणुकीतही आपले नशीब अजमावण्याचा तीन वेळा प्रयत्न केला आहे.

पहिली लोकसभा निवडणूक त्यांनी १९८९ मध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून लढविली होती. त्यात त्यांना एक लाख ३४ हजार ४५९ मते मिळाली होती. दुसरी निवडणूक १९९१ मध्ये लढले. तीत केवळ २० हजार ५९३ मते मिळाले होते. लागोपाठ दोन निवडणुका त्यांनी लोकसभेच्या लढविल्यानंतर त्यांना अपयश आले होते. म्हणून त्यांनी विधानसभेतच राहण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र पुन्हा २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास टाकत लोकसभेची उमेदवारी दिली. त्यात त्यांनी ऐनवेळेस उमेदवारी जाहीर होऊनही जोरदार लढत दिली. त्यांना पाच लाख ४१ हजार ९३० मते मिळाली होती. साधारण ९५ हजार ५५० मतांनी ते पराभूत, तर डॉ. हीना गावित विजयी झाल्या होत्या.

एकंदरीत ॲड. के. सी. पाडवी यांनी आतापर्यंत तीनदा लोकसभेची उमेदवारी केली. मात्र यश आले नाही. यावेळेस चौथ्यांदा त्यांना उमेदवारीची संधी होती. मात्र त्यांनी ती संधी आपल्या मुलाला म्हणजे ॲड. गोवाल पाडवी यांनी उपलब्ध करून देत लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली. केवळ उमेदवारीच नाही, तर ही गोवाल पाडवी यांच्यासाठी राजकीय श्रीगणेशा करण्यासाठीची मोठी संधीच ठरली आहे.

K. C. Padavi and Gowal Padavi
Loksabha Elections 2024: ठाकरे गट-काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणाऱ्या ५ मतदारसंघांचा लेखाजोखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.