नंदुरबार लोकसभा मतदारसंघात गेली दहा वर्षे राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी मावळत्या खासदार डॉ. हीना गावित यांनी केलेले प्रयत्न नंदुरबारच्या जनतेच्या कायम स्मरणात राहण्यासारखे आहेत. त्यांना जनतेने पराभव करून नाकारले असले, तरी त्यांचा पराभव हा मतदारसंघाचा विकासकामांवर नक्कीच परिणाम करणारा ठरू शकतो.
त्यांच्या रूपाने नंदुरबार जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिपदाची भेट नक्कीच मिळण्याची शक्यता होती. पराभवामुळे ते हुकले म्हणजे मतदारसंघाने पुढील पाच वर्षांतील भरीव विकासाची संधी नाकारल्यागत आहे, असे मत जाणकारांमधून व्यक्त होऊ लागले आहे. (Nandurbar Lok Sabha Election 2024 Result Dr Heena Gavit defeat)
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ म्हणता येणार नाही. अर्थात, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व मावळत्या खासदार डॉ. हीना गावित यांनी केलेली कामे ही नोंद घेण्यासारखी आहेत. केवळ मोदी सरकारमुळे आरक्षण जाऊ शकेल, याची भीती खरोखरच मतदारांमध्ये निर्माण झाली होती.
त्यामुळे मोदी सरकार रोखण्यासाठी खरे जनमत विरोधात गेले. एकाच कुटुंबाकडे राजकीय सत्ता या स्थानिक नेत्यांनी केलेल्या आरोपांमध्येही तथ्य असले, तरी त्याचे मतदारांना काही देणे-घेणे नव्हते. केवळ कांगावा केला गेला. सोशल मीडियावर वातावरण निर्मिती केली गेली.
त्यातूनच डॉ. हीना गावित यांचा पराभव झाला, असे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करू लागले आहेत. त्यात काहीसे तथ्यही आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. राजकारणात संघर्ष आणि जय-विजय हा होतो व जातो. मात्र, नंदुरबार मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी देऊन नंदुरबारच्या जनतेने काय कमावले? असा प्रश्न जर उपस्थित केला तर नक्कीच नंदुरबार जिल्ह्याचे नुकसान झाले आहे.
कारण, नवीन खासदारांची पाच वर्षे ही आता शिकण्यात आणि अभ्यासात जाणार आहेत. त्यातच केंद्रात भाजप (एनडीए)ची सत्ता स्थापन होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नवीन खासदार सत्तेत नसणार, तर ते विरोधी गटात असतील. त्यामुळे सत्ताधारी विरोधी गटाच्या खासदारांना विकासासाठी किती सहकार्य करतील, हा मोठा प्रश्न आहे. अशा एक ना अनेक समस्यांचा संघर्ष नूतन खासदार गोवाल पाडवी यांना करावा लागेल. (latest marathi news)
डॉ. हीना गावित यांनी हॅटट्रिक साधली असती, तर हेच चित्र सकारात्मक राहिले असते. कारण, डॉ. गावित यांना दहा वर्षांचा अनुभव होता. दिल्ली दरबारी प्रश्न मांडण्याची व सोडविण्यासाठी संघर्षाची तयारी होती. दिल्ली दरबारातून निधी व योजना कशा पदरी पाडायच्या, याचा अभ्यास झाला होता. नवीन काही तरी करण्याची तळमळ होती.
नव्या संकल्पना मनात होत्या. त्यातच त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि मंत्रिमंडळात अत्यंत जवळच्या व विश्वासू खासदार मानल्या जात होत्या. मागील दोन वर्षांपूर्वी हुकलेल्या केंद्रीय मंत्रिपदाची संधी त्यांना नक्कीच नवीन मंत्रिमंडळात मिळण्याची शक्यता होती.
तसे संकेत भाजप वरिष्ठ नेत्यांकडून मिळत होते. त्या मंत्री म्हणून सक्षमपणे केंद्रात काम करू शकतील, असा विश्वास नेतृत्वाला होता. त्यांच्या मंत्रिपदामुळे नंदुरबारलाच नव्हे, तर खानदेशला विकासाची नवी दिशा मिळाली असती, असे मत जाणकार व्यक्त करू लागले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.