Nandurbar Lok Sabha Election : विधानसभा नवापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पथकाच्या गृहभेटीत मतदान करताना ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांच्या चेहऱ्यावर मतदान केल्याचे समाधान झळकले. १३ मेस होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती नवापूरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली.
आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकीत प्रथमच ८५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले दिव्यांग मतदार यांच्यासाठी गृहभेटीद्वारे मतदानाची अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. (Nandurbar Lok Sabha Election 2024 used their right in home visit of polling team)
विधानसभा नवापूर मतदारसंघांतर्गत यासाठी ८५ वर्षे व दिव्यांग मतदारांशी संपर्क करून या मतदारांना मतदान केंद्रावरच मतदान करायचे किंवा गृहभेटीद्वारे मतदान करायचे यापैकी एक संमती घेण्यात आली. यानुसार वय वर्षे ८५ वरील असलेले १७३ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगत्वामुळे मतदानासाठी मतदान केंद्रात मतदान करणे शक्य नसणारे २० मतदार अशा एकूण १९३ मतदारांसाठी गृहभेटीद्वारे मतदानासाठी संमती दर्शविल्याने आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ८ व ९ मेस या मतदारांचे गृहभेटीद्वारे मतदान प्रशानाकडून घेण्यात आले.
यासाठी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. अनुभवी क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान अधिकारी क्रमांक एक आणि त्यांच्या सहाय्यासाठी बीएलओ पर्यवेक्षकांनी मतदान अधिकारी क्रमांक दोन कामकाज पाहिले. त्यांच्यासोबत सूक्ष्म निरीक्षक, व्हिडिओग्राफर आणि पोलिस तसेच कोतवाल यांचे सहाय्य घेण्यात आले. या लोकसभा निवडणुकीत प्रथमच ही संकल्पना राबविण्यात येत असल्याने अधिकारी-कर्मचारीदेखील अतिशय उत्साही होते. (latest marathi news)
एकूण १९३ ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदारांपैकी गुरुवारअखेर १८० मतदारांनी गृहभेटीद्वारे मतदानाचा हक्क बजावला. शिल्लक १३ मतदारांपैकी चार मतदार मृत असून, पाच मतदार बाहेरगावी गेलेले आहेत, तर चार मतदार आजारी असल्याने जिल्ह्याबाहेरील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. बाहेरगावी गेलेल्या पाच मतदारांशी संपर्क करून ते शुक्रवारी त्यांचे घरी आल्यास गृहभेटीद्वारे मतदान करून घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले.
गृहभेटीद्वारे मतदान पथकाचे नियोजन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी केले व या पथकास मार्गदर्शन करून या कामकाजावर सनियंत्रण ठेवले. त्यांना सहाय्यासाठी तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, नायब तहसीलदार भक्तराज सोनवणे, सुरेखा जगताप, पंकज खैरनार, जयेश जोशी आदींनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.