Nandurbar Lok Sabha Election : कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत भाजपच्या डॉ. हिना गावित यांनी दोन वेळेस वर्चस्व कायम राखले. तिसऱ्यांदांही पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर करून संधी दिली आहे. त्यांच्यासमोर कॉंग्रेस महाविकास आघाडीकडून आतापर्यंत धडगावचे आमदार तथा माजी मंत्री ॲड. के. सी.पाडवी यांचे नाव आघाडीवर होते. त्यांच्यासोबतच जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा रजनी नाईक यांचे नाव चर्चेत होते. (Nandurbar Lok Sabha Election BJP Dr Heena Gavit against Adv Goval Padavi)
त्यानंतर दोन्ही नावे मागे पडून आता आमदार पाडवी यांनी मुलगा ॲड. गोवल पाडवी यास पुढे करून त्यांचा राजकारणाचा श्री गणेशा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आता ॲड. पाडवी यांचे नाव झळकू लागले आहे. नंदुरबार मतदारसंघाचे गेल्या दहा वर्षापासून भाजपच्या डॉ. हिना गावित या खासदार म्हणून नेतृत्व करीत आहेत.
२०१४ मध्ये टॉप टेन खासदार अशी ओळख असलेले व आठवेळा खासदारकी भूषविलेले माणिकराव गावित यांचा पराभव करून डॉ. गावित यांनी राजकिय इतिहास घडविला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपचे डॉ. हिना गावित यांची उमेदवारी भाजपने कायम ठेवली तर कॉंग्रेसच्या माणिकराव गावित यांनी वाढत्या वयामुळे उमेदवारी करण्यास नकार दिला.
त्यामुळे त्यांचा मुलगा भरत गावित यांनी उमेदवारी करावी, असे कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी सुचविले होते. मात्र भरत गावित यांनी नकार दिल्यामुळे आमदार ॲड. के. सी.पाडवी यांना उमेदवारी दिली होती. त्यात ९५ हजार सहाशे मतांनी डॉ. हिना गावित यांनी विजय मिळविला होता. (latest marathi news)
आता २०२४ च्या निवडणुकीत खासदार डॉ. हिना गावित यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासमोर पुन्हा कॉंग्रेसचे ॲड. के. सी. पाडवी यांनी उमेदवारी करण्याची घोषणा केली होती. पक्षश्रेष्ठींकडे आग्रहही धरला होता. त्यांचासोबतच नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या पत्नी रजनी नाईक यांच्या उमेदवारीची मागणीही पुढे आली.
दरम्यान, ॲड. पाडवी पुन्हा झाल्याने नाईक कुटुंबाने सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे के.सी.पाडवी हेच कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असल्याचे निश्चित झाले असतांना आता पुन्हा कॉंग्रेसच्या दिल्ली येथील संभाव्य उमेदवारांच्या यादीत ॲड. पाडवी यांचे चिंरजीव ॲड. गोवल पाडवी हे नाव झळकू लागले आहे. कदाचित उच्चशिक्षित, तरूण म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.