Nandurbar Lok Sabha Election : मतदानप्रक्रिया संपताच नेत्यांच्या बंगल्यांवर शुकशुकाट; आता प्रतीक्षा निवडणुकीचा निकालाची

Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी दोन महिन्यांपासून सुरू होती. त्यामुळे जिकडे-तिकडे निवडणुकीचा माहोल तयार झाला होता.
Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Constituencyesakal
Updated on

Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी दोन महिन्यांपासून सुरू होती. त्यामुळे जिकडे-तिकडे निवडणुकीचा माहोल तयार झाला होता. गावपातळीवरील लहान-मोठे कार्यकर्ते, पदाधिकारीही ॲक्टिव्ह झाले होते. त्यामुळे जो-तो उठलेसुटले नेत्यांच्या बंगल्यावर येऊ भेटीगाठी घेत ‘मी तुमचाच’ असे दाखविण्यासाठी गर्दी करू लागले. ( citizens are waiting for election results )

मात्र मतदान संपताच आता नेत्यांच्या बंगल्यावरील कार्यकर्त्यांचा ओघ कमी झाला असून, बंगल्यांवर शुकशुकाट दिसू लागला आहे. ही गर्दी मात्र पुन्हा ४ जूनच्या निकालानंतर आठवडाभर वाढणार आहे. नंदुरबार लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचाली तीन महिन्यांपूर्वीपासूनच सुरू झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या गावपातळीवर भेटी, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी संवाद, निवडणुकीसाठीच्या सूचना, किरकोळ वाद, नाराजीनाट्य दूर करून निवडणुकीसाठी एकत्र येण्यासाठी नेत्यांकडून मनधरणी असे कार्यक्रम सुरू होते.

निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर मात्र उमेदवार व पक्षाच्या नेत्यांच्या बंगल्यावंर ग्रामीण-शहरी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठकींचा सिलसिला सुरू झाला होता. त्यामुळे नेत्यांच्या बंगल्यांवर सतत गर्दीच गर्दी दिसू लागली. नेत्यांना भेटण्यासाठी दोन-तीन तास प्रतीक्षा करणारे कार्यकर्ते, रात्री-अपरात्री होणाऱ्या गुप्त बैठका व निवडणुकीचे नियोजन यामुळे रात्रंदिवस नेत्यांच्या बंगल्यांवर ही गर्दी दिसू लागली. (latest marathi news)

Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Election 2024 : इच्छुकांमध्ये कही खुशी, कही गम!

एवढेच नव्हे तर नेतेमंडळी गावपातळीवर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र करीत मार्गदर्शन करत असत. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य, सरपंच या मंडळींकडेही नेहमी गर्दीची वर्दळ वाढली होती. जसजशी मतदानाची १३ तारीख जवळ येत होती तसतसे नेत्यांच्या घरी यात्रेचे स्वरूप आले होते.

कुठे गटातटाचे राजकारणाचे तंटे नेत्यांसमोर मोडले जात होते, तर कुठे पक्षांतर्गत वाद, कुठे या पक्षाचा सरपंच त्या पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न, तर कधी विकासकामे करण्याच्या बोलीवर समर्थन देण्याची चर्चा, त्यासोबतच सर्वांत महत्त्वाचा एक गट म्हणजे ठेकेदार, या ठेकेदारांचा डेरा नेहमीच नेत्यांच्या बंगल्यावर दिसायचा. निवडणुकीत सहकार्य केले नाही तर भविष्यात कामांचा ठेका मिळणार नाही या भीतीने अनेक ठेकेदार नेत्यांच्या बंगल्यावरच दिसू लागले.

असे एकंदरीत चित्र मतदानाच्या दिवसापर्यंत होते. त्यानंतर १४ मेस काहीशी ही गर्दी दिसून आली. मात्र आता दोन दिवस उलटले कोणत्याही पक्षाच्या नेत्यांसह उमेदवारांच्या बंगल्यावरची गर्दी ओसरली आहे. सर्वत्र शुकाट दिसून येत आहे. मात्र ही गर्दी पुन्हा वाढेल, त्यासाठी त्यांना ४ जूनला निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Election: मतदान पथकाच्या गृहभेटीत ‘त्यांनी’ बजावला हक्क! नवापूर येथे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाचे मतदान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.