Nandurbar Lok Sabha Analysis : नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत शिरपूर विधानसभा मतदारसंघाने या वेळीही भारतीय जनता पक्षाला साथ दिली, पण ती तोकडी ठरली. आदिवासीबहुल मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा प्रबळ आधार ठरलेला आदिवासी मतदारच यंदा भाजपपासून दुरावल्याचे स्पष्ट झाले. या तुलनेत बिगरआदिवासी भाग आणि शहर येथून भाजपला चांगली मते मिळाली. (election Congress got lot of votes in shirpur )
या निवडणुकीत तालुक्याचे तीन भाग पडल्याचे स्पष्ट होते. आदिवासीबहुल ग्रामीण भागात संविधानाला आणि आरक्षणाला भाजपकडून धोका असल्याचा प्रचार कमालीचा प्रभावी ठरला. त्याचे खंडन भाजपला अखेरपर्यंत करता आले नाही. त्यामुळे काँग्रेसला तेथे भरभरून मते मिळाली. येथे काँग्रेसच्या मतांमधील मोठी तफावत रोखण्यात यश मिळाले. बिगरआदिवासी ग्रामीण भागात भाजपला संमिश्र यश प्राप्त झाले.
परंतु मतदानाचा टक्का न वाढल्याचा फटकाही बसला. शहरात भाजपने बऱ्यापैकी मते घेतली. मात्र तेथेही मतदानाचा टक्का फारसा वाढला नाही. त्यामुळे २०१४ ला ५० हजारांहून अधिक, २०१९ ला १० हजारांहून अधिक मताधिक्य भाजपला देणाऱ्या शिरपुरातून २०२४ मध्ये केवळ २० हजारांचे मताधिक्य मिळाले. ते विजयासाठी पुरेसे ठरणार नव्हतेच, पण किमान भाजपला या मतदारसंघात आश्वासक परिस्थिती असल्याचा संदेश मात्र शिरपूरने नक्कीच दिला.
२०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार अमरिशभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी भाजपला तालुक्यात वर्चस्व राखणे शक्य झाले. स्वत:ची प्रकृती अस्वस्थ असतानाही अमरिशभाई पटेल यांनी जोरदार प्रचारमोहीम राबविली. आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, लोकसभा निवडणूकप्रमुख डॉ. तुषार रंधे यांनी त्यांना साथ दिली. (latest marathi news)
काँग्रेसचे उमेदवार अॅड. गोवाल पाडवी यांनी शिरपूरबाबत कमालीची सावधगिरी बाळगली. शिरपूरमधून काँग्रेसला मताधिक्य मिळू शकणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी केवळ भाजपचे मताधिक्य कसे कमी करता येईल, यावर अधिक भर दिला. शिरपूरमध्ये कोणतीच मोठी प्रचारमोहीम न राबविता कोपरासभांवर भर देत त्यांनी सकारात्मक प्रचार केला.
त्यांना शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उत्तम साथ लाभली. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे भाजपवर नाराज असलेल्या युवकांचा मोठा प्रवाह स्वत:कडे वळविण्यात ते यशस्वी ठरले. त्यात २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविलेल्या अॅड. के. सी. पाडवी यांच्या अनुभवाचा फायदाही त्यांना झाला.
आदिवासी भागात उत्तम प्रतिसाद
कोरी पाटी, स्वच्छ प्रतिमा, वादरहित आणि उच्चशिक्षित असलेल्या अॅड. गोवाल पाडवी यांना आदिवासी भागात उत्तम प्रतिसाद लाभला. परिणामी भाजपच्या मताधिक्याचा वारू रोखण्यात त्यांना यश प्राप्त झाले. अन्य मतदारसंघांतून मोठ्या प्रमाणावर मते मिळवायची आणि भाजपच्या हुकमी मतदारसंघातील मते रोखायची हे त्यांचे धोरण शिरपूर तालुक्यात यशस्वी ठरल्याचे निकालावरून दिसून आले. शिरपूरने भाजप उमेदवाराला मदत दिली खरी, पण ती पुरेशी ठरली नाही, हाच या निकालाचा अन्वयार्थ म्हणता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.