Nandurbar Lok Sabha Election : वाढलेले मतदान कुणाच्या फायद्याचे? मतदानानंतर आकडेमोड, चर्चांना वेग

Lok Sabha Election : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची धामधूम मतदानानंतर काहीशी थंडावली असून, आता सर्वांना उत्सुकता ४ जूनच्या निकालाची आहे.
Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Constituencyesakal
Updated on

Nandurbar Lok Sabha Election : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची धामधूम मतदानानंतर काहीशी थंडावली असून, आता सर्वांना उत्सुकता ४ जूनच्या निकालाची आहे. यातच १३ तारखेला साक्री विधानसभा क्षेत्रात झालेल्या मतदानात गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा दोन टक्क्यांची वाढ झाल्याने हे वाढलेले मतदान कुणाच्या फायद्याचे आणि कुणाच्या अडचणी वाढवणारे ठरेल, यावर देखील आकडेमोड व चर्चा रंगू लागल्या आहेत. ( everyone is curious about June 4 result )

सोमवारी (ता. १३) नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील साक्री विधानसभा मतदारसंघात मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले. तीन लाख ५६ हजार ९८५ मतदारांपैकी दोन लाख ४१ हजार ३३३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत साक्री विधानसभा क्षेत्रात ६५.५१ टक्के मतदान झाले होते, तर यंदाच्या निवडणुकीत ६७.६० टक्के इतके मतदान झाले. हे वाढलेले दोन टक्के मतदान नेमके कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर मतदानानंतर चर्चा रंगू लागल्या आहेत.

लढत झाली चुरशीची

निवडणुकीत भाजपतर्फे विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांना तिसऱ्यांदा संधी दिल्यानंतर काँग्रेसतर्फे ॲड. गोवाल पाडवी या नवख्या उमेदवाराला संधी देण्यात आली होती. ॲड. पाडवी यांच्या उमेदवारीमुळे सुरवातीला निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र गेल्या दोन निवडणुकांतील विजयामुळे निर्माण झालेली ॲन्टीइन्क्मबन्सी, खासदार डॉ. गावित यांचा कमी झालेला संपर्क, तालुक्याचा रखडलेल्या विकासाचा मुद्दा, शेतकऱ्यांमध्ये कांदा दरावरून असलेली नाराजी यामुळे ही निवडणूक अंतिम टप्प्यात अतिशय चुरशीची झाली. अशा परिस्थितीत तालुकावासीयांनी आपले मत कुणाच्या पारड्यात टाकले, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (latest marathi news)

Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Election : झालेल्या अन् रखडलेल्या विकासाच्या मुद्यावर प्रचार रंगणार

महायुती, महाविकास आघाडीचा कस

महिनाभर महायुती, तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचाराचा धुराळा उडवत आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. साक्री तालुका हा अनेक वेळा काँग्रेसच्या पाठीशी राहिला असल्याने यंदादेखील तालुक्यातून काँग्रेस उमेदवाराला आघाडी मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या निवडणुकीतदेखील जवळपास दहा हजारांची आघाडी काँग्रेस उमेदवाराला मिळाली होती.

निवडणूक प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व नेत्यांनी एकजुटीने तालुक्यात प्रचार करत आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यांना भाजपमधील अनेक नाराज नेत्यांची देखील मोठी मदत झाली. शिवसेना शिंदे गटात असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील कुठे उघडपणे तर अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने काँग्रेस उमेदवारास मदत केल्याचे दिसून आले.

दुसरीकडे भाजपमध्ये मात्र गटातटाच्या वादामुळे प्रचारात एकी दिसून आलेली नाही. प्रचारादरम्यान भाजपमधील दोन गटांमध्ये मुद्द्यांची लढाई थेट गुद्यांपर्यंत जाऊन पोचल्याने याचा परिणाम निवडणुकीवर कसा होतो, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Election: मतदान पथकाच्या गृहभेटीत ‘त्यांनी’ बजावला हक्क! नवापूर येथे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाचे मतदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.