Nandurbar Lok Sabha Constituency : डॉ. हीना गावित, चंद्रकांत रघुवंशी यांच्या भेटीचा मतितार्था

Nandurbar News : महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेत प्रचारात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याचे कळते.
Dr. Heena Gavit,  Chandrakant Raghuvanshi
Dr. Heena Gavit, Chandrakant Raghuvanshiesakal
Updated on

Nandurbar News : दीड महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर प्रचाराला सुरवात झाल्यानंतर मित्रपक्षांची भेट घेण्याचा मुहूर्त शनिवारी (ता. २७) गवसला. महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेत प्रचारात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याचे कळते. (Nandurbar Lok Sabha Constituency)

मात्र या भेटीत डॉ. हीना गावित यांचे स्वागत करीत चंद्रकांत रघुवंशी यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या असल्या तरी ही भेट निष्फळ ठरणार असल्याचे चित्र रघुवंशी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून दिसून येते. नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात युतीधर्म पाळत मंत्री डॉ. विजयकुमार गावित व चंद्रकांत रघुवंशी यांच्यात अनेकदा वेल्डिंग झाली.

ती वेल्डिंग केवळ निवडणुकीपुरतीच मर्यादित राहिल्याचे जिल्ह्यातील जनतेने अनुभवले आहे. त्यात वेल्डिंग कोणामुळे व कोणत्या कारणांमुळे तुटत गेली हे जिल्हावासीयांना चांगलेच ज्ञात आहे. असे असले तरी या दोन्ही नेत्यांमध्येच राजकीय संघर्ष आहे. हे दोन्ही नेते सत्तेत मित्रपक्ष असले तरी त्यांचा संघर्ष कायम आहे. याचा प्रत्यय पुन्हा आला.

सध्या राज्यात शिवसेना (शिंदे गट), राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजपसोबत महायुतीत आहेत. मित्रपक्ष म्हणून निवडणुकीतही जागावाटप करीत एकमेकांना मदत करण्याचे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघही याला अपवाद नाही. मात्र येथे मित्रपक्ष असूनही तिन्ही मित्रपक्ष तीन वाटेला आहेत. भाजपचे खासदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष हे शिवसेना, राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेत नाहीत, त्यांची कामे करीत नाहीत.

त्या पक्षाशी संबंधित लाभार्थींना योजनेस पात्र असताना लाभ देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपच्या या नेत्यांपासून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अलिप्त आहे. असे असले तरी मित्रपक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांची साथ गरजेची आहे, मात्र असे असतानाही मित्रपक्षांना महायुतीचा उमेदवार किंवा त्यांचा नेत्यांकडून निवडणुकीसंदर्भात कोणत्याही बाबतीत संपर्क केला गेला नाही. (Latest Marathi News)

Dr. Heena Gavit,  Chandrakant Raghuvanshi
Nandurbar Agriculture News : बोरद परिसरातील शेतकऱ्यांची आधुनिक शेतीकडे वाटचाल; बियाण्याऐवजी रोपलागवडीकडे वाढता कल

विश्‍वासात घेतले गेले नाही, असे शिवसेना व राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. निवडणूक प्रक्रियेला पक्षीय स्तरावरील हालचालींना पावणेदोन महिने उलटले, तरीही त्यांना विचारणा झालेली नाही. अर्थात, गावित परिवारातील उमेदवारीला शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीरपणे विरोध दर्शविला होता.

त्यामुळे त्याचाही राग गावित कुटुंबीयांना असावा आणि तो असणे साहजिकच आहे. त्यावरून गावित कुटुंबांच्या लक्षात आले, की हे मित्रपक्ष असूनही आपल्याला जाहीरपणे विरोध करत आहेत, म्हणजेच निवडणुकीत आपल्याला यांची मदत लाभेलच, असे नाही. त्यामुळे गावित कुटुंबीयांकडून चंद्रकांत रघुवंशी असो की डॉ. अभिजित मोरे असो त्यांना फारसे महत्त्व दिले नसावे.

म्हणूनच दीड महिने उलटूनही त्यांना भाजपचे कोणीही नेते, मंत्री किंवा उमेदवारांनी मित्रपक्षाच्या नेत्यांना भेटलेले नसावेत. म्हणजेच असाही विरोधच होईल तर भेटून उपयोग काय? असा प्रश्‍न कदाचित डॉ. कुटुंबीयांना पडला असावा. त्यामुळे त्यांनी या नेत्यांना भेटणे टाळले असावे. प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नेते व उमेदवार यांनी ही धुसफूस हेरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटून आपलेसे केले.

Dr. Heena Gavit,  Chandrakant Raghuvanshi
Nandurbar Lok Sabha Constituency : छाननीअंती 16 उमेदवारी अर्ज वैध!

त्यानंतर त्यांच्या शक्तिप्रदर्शन रॅलीत मित्रपक्षाचे कार्यकर्ते दिसले. त्यामुळे आज शहरातील गणपतीरायाचे दर्शन घेत नंतर दुपारी महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. आलेल्या पाहुण्यांचा आदर करीत चंद्रकांत रघुवंशी यांनी उमेदवाराचे स्वागत करीत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. बंद दाराआड चर्चाही झाली.

त्यानंतर डॉ. हीना गावित यांनी सदिच्छा भेट घेतल्याचे म्हटले. मात्र शिवसेना नेत्यांनी माध्यमांशी बोलताना भेटीसाठी दीड महिन्याचा कालावधी लागला, लवकर भेटायला आले असते, तर कदाचित कटुता कमी झाली असती, असे म्हणत त्यांनी मित्रपक्षाला दिलेल्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.

तसेच कार्यकर्तेही आता ऐकण्याचा मनःस्थितीत नसल्याचे सांगत हा विषय आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात जाऊन चर्चा करावा लागणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजची भेट निष्फळ ठरणार असल्याची चर्चा आहे.

Dr. Heena Gavit,  Chandrakant Raghuvanshi
Nandurbar Loksabha Election : नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकणारच; काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके यांचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.