नंदुरबार : नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे विद्यमान मंत्री डॉ. विजयकुमार गावित हेच उमेदवार असल्याचे निश्चित झाल्यात जमा आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात डॉ. गावित यांच्या तुलनेत ताकदीचा उमेदवार भाजपकडे आज तरी नाही. तर या मतदारसंघात त्यांच्यासमोर कॉंग्रेसचा उमेदवार असतो. कॉंग्रेसकडून अनेकजण इच्छुक आहेत. कॉंग्रेसतर्फे इच्छुकांची चाचपणी मुलाखतीच्या माध्यमातून नुकत्याच झाली. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. (Many people want candidacy of Dr BJP in constituency of Garvit name is fixed)
येत्या आठवडाभरात केव्हाही विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर होऊन आचारसंहिता लागू शकेल, असे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. भाजपमध्ये तुल्यबळ उमेदवार नाही. इतर पक्षातील उमेदवार भाजपमध्ये आला तरी डॉ. गावित यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने आपल्याला उमेदवारी मिळणार नाही म्हणून इतर कोणी भाजपमध्ये येऊ इच्छित नाहीत.
मात्र, तरीही काहीजणांनी गावित कुटुंबात उमेदवारीला विरोध दर्शवित भाजप नेत्यांची भेट घेऊन इतर उमेदवार देण्याची मागणी केली आहे. तर कॉंग्रेसतर्फे २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे डॉ. गावित यांच्यासमोर तळोद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी हे उमेदवार होते. त्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने ते ऐनवेळी नंदुरबार विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र, पराभव पत्कारावा लागला होता. (latest marathi news)
यावेळी नंदुरबार विधानसभेसाठी कॉंग्रेसकडून नुकत्याच झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीनुसार भाजपचे जुने जाणते ज्येष्ठनेते डॉ. सुहास नटावदकर यांची कन्या डॉ. समिधा नटावदकर, कॉंग्रेसच्या जेष्ठ कार्यकर्त्या व महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हिराबाई विलास पाडवी, विश्वनाथ कांतीलाल वळवी, कॉंग्रेसचे माजी आमदार इंद्रसिंग वसावे, सुरजितसिंग इंद्रसिंग वसावे, इंजि. किरण दामोदर तडवी हे सहा जण इच्छुक आहेत.
उमेदवारीसाठी पक्ष बदल
स्वपक्षात उमेदवारी मिळणार नाही म्हणून यात काही जणांनी पक्ष बदलाची क्लृप्ती वापरली आहे. डॉ. समिधा नटावदकर यांची कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी भाजपची आहे. मात्र, भाजपमध्ये उमेदवारी मिळणार नाही म्हणून त्या कॉंग्रेसकडे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच, इंजि. किरण तडवी हे शिवसेनेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय आहेत.
शिवसेना-भाजप युतीमुळे नंदुरबारची जागा भाजपला सुटते म्हणून शिंदे शिवसेनेत उमेदवारी मिळणार नाही म्हणून उमेदवारीसाठी कॉंग्रेसला साकडे घालत आहेत. ही मंडळी यापूर्वी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून आली आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी जोर लावला जात आहे. इतर पक्षातील उमेदवारांना उमेदवारी मिळाल्यास कॉंग्रेसचे निष्ठावंत इच्छुक कार्यकर्ते नाराज होतील, हेही तेवढेच सत्य आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.