वाण्याविहीर (नंदुरबार) : अक्कलकुवा तालुक्यामध्ये कोरोना महामारीविरुद्ध (Nandurbar corona update) लढण्यासाठी, तसेच कोरोना महामारीवर नियंत्रणासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली असून, तालुक्यात लस घेणाऱ्या (Corona vaccination) नागरिकांची संख्या पंधरा हजारांचा आकडा पूर्ण करण्याकडे मजल मारली आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील दुर्गम भागात लसीकरणाचे प्रमाण वाढले असून, त्यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. (nandurbar-corona-vaccination-ratio-up-last-month)
अक्कलकुवा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये (Village corona vaccination center) तालुका प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे व योग्य नियोजनामुळे तालुक्यातील कोरोना लसीकरणाचा आकडा पंधरा हजार हा विक्रमी अंक गाठण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. विशेषतः तालुक्यातील दुर्गम भागांमध्ये आयोजित होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या शिबिरामुळे तालुक्यातील अधिकाधिक नागरिक आता लसीकरणाकडे वळू लागले आहेत. प्रभारी तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी मालखेडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी रमेश देसले यांसह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरणासाठी नियोजन पूर्णपणे लसीकरणाबाबत जनजागृती करून शिबिरांचे योग्य आयोजन केल्यामुळे, तसेच त्यांना मिळालेल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी, तसेच राजकीय पदाधिकारी यांच्या सहकार्याने तालुक्यातील लसीकरणाच्या आकडा पंधरा हजारांजवळ पोचला आहे.
गांधी टोपीची कमाल
लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी, तसेच अधिकाधिक नागरिकांनी लसीकरणासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, यासाठी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी, ‘मी लस घेतली, तुम्हीही घ्या’, हे लिहिलेली गांधी टोपी समोर येईल त्याला घालून जणू लसीकरणासाठी ते प्रवृत्त करीत असल्याचा उपक्रम या लसीकरण मोहिमेला अधिक फलदायी करत असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत. त्यांची ही गांधीगिरी तालुक्यातील लसीकरणाला जादूई आकड्यापर्यंत नक्कीच घेऊन जाईल.
मुस्लिम बांधवांचा अल्प प्रतिसाद
अक्कलकुवा शहरासह तालुक्यात बहुसंख्येने असलेल्या मुस्लिम बांधवांनी कोरोना लसीकरणाबाबत अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्यामुळे त्यांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागापुढे आव्हान आहे. याबाबत मुस्लिम बांधवांचे ज्येष्ठ मंडळी लसीकरण करून घेण्यासाठी समाज माध्यमांद्वारे आवाहन करीत असतानाही योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तालुक्यातील लसीकरण पूर्ण करणे अडथळ्याची शर्यत ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.