Nandurbar Market Committee Election : सहाही बाजार समित्यांसाठी छाननीअंती 463 अर्ज वैध

 market committee election
market committee electionesakal
Updated on

Nandurbar Market Committee Election : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येकी १८ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक होत आहे. (Nandurbar Market Committee Election 463 application valid after scrutiny for 6 market committees news)

त्यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांसाठी ५०३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी छाननीअंती आता ४६३ उमेदवारी अर्ज वैध ठरले.

जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा व नवापूर या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे. या वर्षी निवडणूक अत्यंत चुरशीची होत असल्याने इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे.

स्थानिक स्तरावरील राजकीय गट-तट निर्माण होऊन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सहाही बाजार समित्यांसाठी एकूण ५०३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी छाननी झाली. त्यात ३९ उमेदवारी अर्ज अवैध (नामंजूर) ठरले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

 market committee election
Unseasonal Rain Crop Damage : हतनूर, भडणे, साळवेत अवकाळीने पुन्हा झोडपले

त्यामुळे आता ४६३ अर्ज वैध ठरले आहेत. आता २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. तोपर्यंत कोणकोणत्या गटातटात समझोता होतो, जागांची वाटाघाटी होते, त्यामुळे इच्छुकांची मनधरणी करून कोणकोण अर्ज माघार घेतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

तालुकानिहाय वैध व अवैध उमेदवारी अर्जांची संख्या ः

तालुका - दाखल अर्ज वैध अवैध

नंदुरबार - ९३ - ९१ -०२

शहादा - १८२ - १७५ -०७

नवापूर - ६६ -५६-१०

तळोदा - ८७ - ७७-०९

अक्कलकुवा- ३८-३७-०१

धडगाव - ३७ -२७- १०

एकूण ः ५०३ -४६३ -३९

 market committee election
Market Committee Election : माघारीपूर्वीच उडाला प्रचाराचा धुरळा! बनकर-कदमांच्या प्रचार सभांमुळे तापले वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.