Nandurbar News : शिवणकाम व्यवसायाची उसवली वीण; बोरद येथे काम नसल्याने व्यावसायिकांचे स्थलांतर

Nandurbar News : बोरद येथे टेलरिंग व्यवसाय करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी साधारणतः शिंपी समाजाची एकूण २५ ते ३० कुटुंबे असून, त्यांचा टेलरिंग हा उदरनिर्वाहाचा एकमेव व्यवसाय आहे.
Professionals sitting empty waiting for work as there is no work at present.
Professionals sitting empty waiting for work as there is no work at present.esakal
Updated on

दीपक गोसावी ः सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : बोरद येथे टेलरिंग व्यवसाय करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी साधारणतः शिंपी समाजाची एकूण २५ ते ३० कुटुंबे असून, त्यांचा टेलरिंग हा उदरनिर्वाहाचा एकमेव व्यवसाय आहे. त्यामुळे व्यवसायासाठी काही व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यात १५ ते २० दुकाने आहेत. उर्वरित याच समाजाचे शिवणकाम करणारे कामगारदेखील आहेत. हा व्यवसाय सध्या डबघाईला आल्याचे चित्र बोरद येथे दिसून येत आहे.

प्रत्येक कुटुंबाचा स्वतंत्र टेलर

बाजारात रेडिमेड (तयार) कपडे मिळत नव्हते तेव्हा प्रत्येकाचा एक स्वतंत्र टेलर (शिंपी) असायचा. घरातील सर्व सदस्य मुख्यत्वे पुरुषमंडळी एखाद्या टेलरकडून कपडे शिवून घेत. लहान मुलींसाठी सलवार-कमीज शिवून देण्याचे कामदेखील टेलर करत. स्त्रियांसाठी विविध प्रकारचे ब्लाउज पीस शिवण्याचे कामदेखील टेलर करत असत.

रेडिमेड कपड्यांना अधिक पसंती

आता बाजारामध्ये गरजेनुसार रेडिमेड कपडे मिळू लागल्याने कुटुंबातील सदस्य खरेदीसाठी अशा कपड्यांवर अधिक भर देत आहेत. दुकानात गेल्यानंतर आपल्या मापानुसार वेगवेगळे कपडे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्या कपड्यांमध्ये अनेक प्रकारच्या डिझाइन्सदेखील असतात.

त्यामुळे दुकानात गेल्यानंतर त्या ठिकाणी कुटुंबातील सदस्य समोर टाकलेल्या कपड्यांवर प्रभावित होतात आणि त्या ठिकाणाहून रेडिमेड कपडे खरेदी करतात. सध्या अशा खरेदीचे प्रमाण वाढल्याने टेलरांकडे कपडे शिवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. (latest marathi news)

Professionals sitting empty waiting for work as there is no work at present.
Nandurbar Teacher Recruitment: शिक्षकांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया; 268 जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती

ऑनलाइन कपडे खरेदीवर भर

ज्याप्रमाणे तयार कपडे शहरातील सर्व दुकानांवर मिळतात. त्याचप्रमाणे तयार कपड्यांचा मोठा बाजार ऑनलाइन स्वरूपात सध्या मल्टिमीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात मोबाईलच्या स्वरूपात येऊन ठेपला आहे. त्यात विविध कंपन्यांची ॲप्स आलेली आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांचा ओढादेखील अशा ऑनलाइन खरेदीकडे वाढला आहे.

विजेचा अडथळा

बोरद येथे गेल्या काही महिन्यांपासून विजेची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच वेळा वीज गायब असते. गतकाळात पायाच्या माध्यमातून शिवणकामाचे मशिन चालविले जात होते; परंतु आजकाल मोटरींच्या सहाय्याने शिवणकाम मशिन चालविले जात आहे. विजेच्या समस्येमुळे कपडे शिवू शकत नसल्याची खंत टेलर व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

"रेडिमेडमुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. व्यवसाय होत नसल्याने बोरद येथील दोन ते तीन कुटुंबे परगावी स्थलांतरित झाली आहेत. शासनाने आम्हाला या व्यवसायासाठी मदत करावी. शासकीय योजनेसाठी लागणारे कपडे, विद्यार्थ्यांचे गणवेश शिवण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत." - किशोर जाधव, टेलरिंग व्यावसायिक, बोरद (ता. तळोदा)

Professionals sitting empty waiting for work as there is no work at present.
Nandurbar News : शहाद्यातील पाटचाऱ्या अतिक्रमणमुक्त करा; उपविभागीय अधिकाऱ्यांचे पाटबंधारेला निर्देश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.