Nandurbar News : मध्यम प्रकल्पांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर : आमदार राजेश पाडवी

Nandurbar : तालुक्यातील राणीपूर, शहाणा, दुधखेडा, लंगडी भवानी येथील मध्यम प्रकल्पाचे कामांचे भूमिपूजन आमदार पाडवी यांच्या हस्ते झाले.
MLA Rajesh Padvi during the Bhoomi Puja of Madhyam Project work
MLA Rajesh Padvi during the Bhoomi Puja of Madhyam Project workesakal
Updated on

Nandurbar News : तालुक्यातील राणीपूर, शहाणा, दुधखेडा, लंगडी भवानी येथील मध्यम प्रकल्पांची दुरुस्ती व अस्तित्वातील सिंचन वितरण प्रणालीचे नलिका वितरण प्रणालीद्वारे सक्षमीकरण व सिंचन स्थिरीकरण व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, वरील मध्यम प्रकल्पांसाठी प्रशासकीय मंजुरी शासनाकडून मिळाली आहे. (Nandurbar MLA Rajesh Padvi statement 100 crore fund approved for medium projects)

यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, या प्रकल्पामुळे सुमारे पंधराशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. तालुक्यातील राणीपूर, शहाणा, दुधखेडा, लंगडी भवानी येथील मध्यम प्रकल्पाचे कामांचे भूमिपूजन आमदार पाडवी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

माहिती देताना आमदार पाडवी म्हणाले, की नंदुरबार जिल्हा आदिवासी क्षेत्रात असून, आदिवासी लाभधारकांचे सिंचन क्षेत्र धारणा लहान असल्यामुळे तसेच देखभाल व दुरुस्तीअभावी अस्तित्वातील वितरण प्रणाली बहुतांशी नादुरुस्त व मोडकळीस आलेली आहे, तसेच प्रभावी पद्धतीचे वितरण प्रणालीमध्ये पाण्याचा अधिक मोठ्या प्रमाणात वहनव्यय होत असल्याने अपेक्षित सिंचन होत नाही.

त्यामुळे योजनेचे सक्षमीकरण व आवश्यक दुरुस्त्या करून सिंचन क्षमता पुनर्स्थापना करण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या हितार्थ व दूरदृष्टीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या माध्यमातून राणीपूर, शहाणा, दुधखेडा व लंगडी भवानी येथील मध्यम प्रकल्पांची दुरुस्ती व अस्तित्वातील सिंचन वितरण प्रणालीचे नलिका वितरण प्रणालीद्वारे सक्षमीकरण व सिंचन स्थिरीकरण कामांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे.

यामुळे वरील मध्यम प्रकल्पांच्या अखत्यारीत येणारी पंधराशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. भविष्यासाठी ही योजना शेतकऱ्यांच्या लाभासाठी ठरणार आहे. यासाठी अंदाजित १०० कोटी रुपयांचा निधी लागणार असून, या प्रस्तावाला व कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. (latest marathi news)

या वेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, विनोद जैन, भाजप किसान मोर्चा प्रदेश सदस्य डॉ. किशोर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, दिनेश खंडेलवाल, डॉ. विजय चौधरी, काशीनाथ सोनार, रमेश पवार, रमाशंकर माळी, भरत सोनवणे, करण चव्हाण.

तुषार पाटील, कल्पेश पाटील, छोटू शिंदे, सुभाष वाघ, शरद साळुंखे, किशोर कदम, घनश्याम मराठे, गोपाल गांगुर्डे, किरण सोनवणे, ठाणसिंग चव्हाण, सुभाष पाटील, नवनाथ वाघ, कमलेश जांगिड, नीलेश मतकर, प्रशांत कुलकर्णी, पंकज बागल, दिलवर राजपूत, रमेश सुळे, रवींद्र पाडवी, सुखलाल रावताळे, संतोष राजपूत, अरुण पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

दीड हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

गुजरातच्या धर्तीवर ही योजना राबविली जाणार आहे. योजनेच्या कामावरील खर्च महाराष्ट्र जलसंधारण महामंडळास शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीतून करण्यात येणार आहे. वरील मध्यम प्रकल्पातून पाटचाऱ्या पुनरुज्जीवित होणार असून, विशेष पाइपलाइनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत या मध्यम प्रकल्पातून पाणी पोचवण्यात येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न या महत्त्वाकांशी योजनेमुळे सुटणार आहे. त्यातच वरील चारही प्रकल्प दुरुस्त झाल्याने जवळपास एक हजार ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. मध्यम प्रकल्पातील गाळही काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पातील सिंचनक्षमता वाढणार आहे. वरील चारही मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामाला लवकरच सुरवात केली जाणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.