Nandurbar News : शहादा-तळोदा मतदारसंघासाठी 91 कोटींचा निधी : आमदार राजेश पाडवी

Nandurbar : बिगरआदिवासी विभागातून ४१ कोटी असा एकूण ९१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, लवकरच या कामांना सुरवात करण्यात येईल
Fund
Fund esakal
Updated on

Nandurbar News : यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहादा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने आदिवासी विभागातून ५० कोटी, तसेच बिगरआदिवासी विभागातून ४१ कोटी असा एकूण ९१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, लवकरच या कामांना सुरवात करण्यात येईल, अशी माहिती आमदार राजेश पाडवी यांनी प्रसिद्धी पत्रकाअन्वये दिली. (statement on 91 crore fund for Shahada Taloda constituency )

शहादा विधानसभा मतदारसंघातील शहादा व तळोदा शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात विकासाचा अनुशेष असल्याने विकासकामे करण्यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करून विकासकामांचे प्रस्ताव राज्य शासनाला सादर केले होते व याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मंत्रिमंडळाने व राज्य शासनाने आमदार राजेश पाडवी यांनी सादर केलेल्या विकासकामांच्या प्रस्तावास मान्यता देत सुमारे ९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने शहरी भागासह ग्रामीण भागात लवकरच विकासकामांना सुरवात केली जाणार आहे. शासनाने विकासकामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याने आमदार पाडवी यांनी शासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत संपूर्ण मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत तरी अनेक ठिकाणी आणखी काम करण्याची गरज आहे. यासाठी माझे प्रयत्न सुरू असून, गोमाई नदीवर शहादा व तिखोरा या गावांना जोडणाऱ्या नवीन समांतर पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव आपण शासनाला सादर केला आहे, तसेच हायब्रिड ॲम्युनिटींतर्गत सुमारे ५०० कोटी रुपयांच्या दोन महत्त्वपूर्ण रस्त्यांचा प्रस्ताव आपण शासनाला सादर केला आहे. (latest marathi news)

Fund
Nandurbar News : वृक्ष लागवड संवर्धन करा घर-पाणीपट्टीत सूट मिळवा; ग्रामपंचायतीकडून अनोखा उपक्रम

येत्या काही दिवसांतच यावर निर्णय होऊन यास मान्यता मिळून निधीची तरतूद केली जाणार असल्याने या कामाचा भूमिपूजन सोहळा करून प्रत्यक्ष सुरवात केली जाईल. त्याचप्रमाणे शहादा शहरातील महत्त्वपूर्ण अशा डीपी रोडची निर्मिती करण्यासाठी ९० कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली असून, शहादा शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठीही शासनाची मंजुरी मिळाली आहे.

येत्या काही दिवसांत शहादा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावालाही शासनाची मान्यता मिळणार असून, मतदारसंघातील बहुचर्चित रहाट्यावाड धरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. लघुपाटबंधारे विभागामार्फत पिंगाणा, उंटावद, गोगापूर व दामळदा येथे नवीन बंधाऱ्यांची निर्मिती करण्यासाठीच्या प्रस्तावास मान्यता राज्य शासन देणार असून, या कामाची सुरवात लवकरच केली जाईल, असेही आमदार राजेश पाडवी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

९१ कोटींतून विविध विकासकामे

या ९१ कोटी रुपयांच्या निधीतून शहादा व तळोदा तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागात रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण, संरक्षक भिंतीची निर्मिती व नदी-नाल्यांवरील पुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे दळणवळण सोपे होणार आहे. शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शहादा शहरासाठी तीन कोटी व तळोदा शहरासाठी दोन कोटी रुपयांचा असा एकूण पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, यातून शहरी भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जाणार आहेत.

Fund
Nandurbar News : आग नियंत्रणासाठी फायर बाइक वरदान : पालकमंत्री अनिल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.