Nandurbar News : दिव्यांगांसाठी प्लॅटफॉर्मवर बॅटरी ऑपरेटेड गाड्या देणार : खासदार डॉ. हीना गावित

Nandurbar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेमुळे नंदुरबार रेल्वेस्थानकाला चौथा नवा प्लॅटफॉर्म मिळणार असल्याबरोबरच दोन प्लॅटफॉर्मवर लिफ्टची सोय करून मिळणार आहे.
Prime Minister Narendra Modi inaugurated the development works at Nandurbar under Amrit Bharat Yojana.
Prime Minister Narendra Modi inaugurated the development works at Nandurbar under Amrit Bharat Yojana.esakal
Updated on

Nandurbar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेमुळे नंदुरबार रेल्वेस्थानकाला चौथा नवा प्लॅटफॉर्म मिळणार असल्याबरोबरच दोन प्लॅटफॉर्मवर लिफ्टची सोय करून मिळणार आहे, तसेच जिल्ह्यातील दिव्यांग आणि वयोवृद्ध प्रवाशांची सोय व्हावी म्हणून खासदार निधीतून बॅटरी प्लॅटफॉर्मवर फिरू शकणाऱ्या बॅटरी ऑपरेटेड गाड्या उपलब्ध करून देणार असल्याची माहिती खासदार डॉ. हीना गावित यांनी दिली.

भारतीय रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी अमृत भारत स्टेशन योजना अलीकडेच सुरू करण्यात आली आहे. (MP Dr. Heena gavit statement Battery operated trains will be provided on platform for disabled)

या योजनेंतर्गत रेल्वे अपग्रेड, आधुनिकीकरणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, रनाळे आणि चिंचपाडा या तीन रेल्वेस्थानकांचा समावेश करण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचा ई- प्रारंभ म्हणजे ऑनलाइन प्रारंभ सोमवारी (ता. २६) करण्यात आला.

त्यासाठी नंदुरबार रेल्वेस्थानक आवारात प्रशस्त सोहळा झाला. सोहळ्याप्रसंगी खासदार डॉ. गावित बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनस्क्रीन सोहळा पार पडत असताना नंदुरबार येथे खासदार डॉ. गावित यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, भारतीय जनता पक्षाचे महामंत्री विजय चौधरी.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., रेल्वे विभागाचे कुशल सिंग. हेमंत महावार, आर. के. रंजन. लखनलाल मिणा, अमरेंद्र कुमार, संदीप कुमार, गजेंद्र शर्मा आणि अन्य प्रमुख अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

तीन स्थानकांचा समावेश

प्रारंभी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर कसे प्रयत्नशील आहोत याविषयी सविस्तर सांगितले. (latest marathi news)

Prime Minister Narendra Modi inaugurated the development works at Nandurbar under Amrit Bharat Yojana.
Nandurbar News : आदिवासी समूहाला हक्क, अधिकारापासून बेदखल करण्याचे शासक जातीचे षडयंत्र : वामन मेश्राम

खासदार डॉ. गावित यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वेमार्ग किती महत्त्वाचा आहे आणि पहिल्यांदा खासदार बनल्यापासून रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी किती प्रयत्न केले याविषयी माहिती दिली.

नवीन रेल्वेगाड्या मंजूर करून दिल्या, लोकलच्या धर्तीवर चालणारी मेमू ट्रेनची सेवा मिळवून दिली, अनेक वर्षे रखडलेले उधना-भुसावळ रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्णत्वास आणून दिले, नंदुरबार रेल्वेस्थानकाचा हेरिटेज लुक कायम ठेवत अनेक आधुनिक सुविधा मिळवून दिल्या.

त्यापाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी लागू केलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नंदुरबार, रनाळे आणि चिंचपाडा या तीन स्थानकांचा समावेश करण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या कामांचा प्रारंभ झाल्याचे सांगितले.

Prime Minister Narendra Modi inaugurated the development works at Nandurbar under Amrit Bharat Yojana.
Nandurbar News : मूल्यमापनात घोळ करून मर्जीतल्या शाळांना वाढीव गुण

या सुविधा सुविधा मिळणार

खासदार डॉक्टर हिना गावित पुढे म्हणाल्या की, नंदुरबार रेल्वेस्थानकावर सद्यःस्थितीत तीन प्लॅटफॉर्म आहेत. आता लवकरच चौथा प्लॅटफॉर्म उभारला जाईल. नंदुरबार रेल्वेस्थानकावर इकडच्या बाजूने तिकीट खिडकीची एकच सोय आहे.

आता रेल्वेस्थानकाच्या पलीकडच्या बाजूने आणखी तिकीट खिडकी सुरू केली जाणार असून, रेल्वेपट्ट्याच्या पलीकडील सर्व लोकांना त्याचा लाभ होईल. वृद्ध प्रवाशांची सोय व्हावी म्हणून दोन प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसविण्यात येणार आहे.

त्याचबरोबर खासदार निधीतून प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या बॅटरी ऑपरेटेड गाड्या लवकरच उपलब्ध करून देईन, ज्यामुळे ओझे घेऊन आलेल्या वयस्करांची आणि दिव्यांग प्रवाशांची सोय होईल. दुचाकी चोरी आणि तत्सम गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण रेल्वेस्थानक परिसरात तसेच रेल्वेस्थानकात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.

अमृत भारत स्टेशन योजनेतून अशा सर्व प्रकारचे लाभ प्रवाशांना मिळणार असून, त्यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी मोदी सरकारने मंजूर केला आहे.

Prime Minister Narendra Modi inaugurated the development works at Nandurbar under Amrit Bharat Yojana.
Nandurbar News : तोरणमाळच्या दुर्गम भागाला प्रथमच रस्ते, पाणी, वीज : खासदार डॉ. हीना गावित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.