Nandurbar News : स्वातंत्र्यानंतर या भागात रस्ते बनले नाहीत. घरापर्यंत वीज कनेक्शन मिळाले नाही. येथील दुर्गम आदिवासी बांधवांना पाणीयोजना, रोजगार, अर्थसहाय्य देणाऱ्या योजना यांपैकी कशाचाही लाभ झालेला नव्हता; परंतु मागील दहा वर्षांत या दुर्गम भागाला रस्ते, वीज, पाणी यासह विविध योजनांचा लाभ देण्याचे काम आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या माध्यमातून आणि खासदार बनल्यापासून आपण सातत्याने करीत आहोत. (MP Dr. Heena gavit statement Road water electricity for first time to remote part of Toranmal)
मोदी सरकारच्या धोरणांमुळे इथे कायापालट घडत आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. हीना गावित यांनी केले. खासदार डॉ गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्राणी (धडगाव) तालुक्यात तोरणमाळपासून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील मध्य प्रदेश सीमेलगतच्या अतिदुर्गम गावपाड्यांपर्यंत दौरा केला आणि कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि गॅसकिटसह कपड्यांचे वाटप केले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, की गाव तिथे रस्ता देणारी योजना आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित यांनी अमलात आणली. संपूर्ण तोरणमाळ भागाला सर्वप्रथम सौरदिवे दिले. आता वीज उपकेंद्रदेखील उभारले जाणार असून, निधी मिळवून दिला आहे. जलजीवन मिशन योजना, केंद्रीय अर्थसहाय्य योजना वगैरे माध्यमातून लाभ दिले.
महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भाबरी ते बादल रस्त्याची सुधारणा एक कोटी ५० लाख रुपये, कुंड्या ते खापरमाळ बिमाने रस्त्याची सुधारणा व बांधकाम करणे अंदाजित रक्कम एक कोटी ५० लाख रुपये.
ठक्कर बाप्पा बस्ती सुधार योजनेंतर्गत मौजे भाबरी-पाटीलपाडा येथे रस्ता काँक्रिटीकरण, ठक्कर बाप्पा बस्ती सुधार योजनेंतर्गत कुंड्या येथे सामाजिक सभागृह बांधणे, झापी येथे सामाजिक सभागृह बांधणे, झापी माजणीपाडा येथे सामाजिक सभागृह बांधणे १४.९९ लाख, झापी पाटीलपाडा येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ९.९९ लाख.
झापी येथे सामाजिक सभागृह बांधणे १४.९९ लाख, झापी-माजणीपाडा येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ९.९९ लाख, सिंदीदिगर दुकानपाडा येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे १४.९९ लाख, केलवान्यापाडा रस्ता दुरुस्ती करणे, सिंदीदिगर १० लाख, सोनख्यापाडा नवीन रस्ता तयार करणे सिंदीदिगर १० लाख.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत आपल्या जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकाम यासह विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. लतेश मोरे, सुभाष पावरा, शिवाजी पराडके, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाडवी यांच्यासह स्थानिक सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.