Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबारमध्ये चर्चा विकास अन कोऱ्या पाटीची!

Lok Sabha Constituency : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या खासदार म्हणून डॉ. हीना गावित आहेत.
Dr. Heena Gavit & Adv. Goval Padavi
Dr. Heena Gavit & Adv. Goval Padaviesakal
Updated on

Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या खासदार म्हणून डॉ. हीना गावित आहेत. त्यांनाच पक्षाने पुन्हा संधी दिली. म्हणजेच पक्षाच्या उमेदवारीच्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी गेल्या दहा वर्षांत जनतेशी जोडलेली नाळ, केलेली विकासकामे याकडे पाहिले जाते. त्यांची विकासकामे कुणीही नाकारू शकत नाहीत. मात्र, काहीअंशी त्यांच्याविषयी नाराजी निश्‍चित आहे. (nandurbar MP of Bharatiya Janata Party in Nandurbar Lok Sabha Constituency Dr Heena is villager marathi news)

काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांची पाटी कोरी आहे. त्यांचा ना राजकीय अनुभव, नाही स्वतःचे ठोस कार्य, तरीही यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल. त्यामुळे मतदार भाजपच्या विकासाला साथ देतात, की काँग्रेसच्या हाताला प्रतिसाद देतात, याविषयी नानाविध चर्चा मतदारसंघात रंगू लागल्या आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीपासूनच निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजप व काँग्रेसकडून गावभेटीतून प्रचाराला सुरवात केलीच होती.

त्यात भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित या आघाडीवर होत्या. विविध विकासकामांच्या निमित्ताने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन असो की उद्‍घाटन कार्यक्रम, राज्यातील काही योजना असो की केंद्राच्या... याचा खुबीने वापर करीत मतदारांसमोर मांडल्या. काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी हे तेव्हा मात्र वकिलीची प्रॅक्टिस करीत होते. त्यांचे नाव अचानक काँग्रेसकडून जाहीर झाले, ते उच्चशिक्षित आहेत.(latest marathi news)

Dr. Heena Gavit & Adv. Goval Padavi
Nandurbar Lok Sabha Constituency : अर्ज खरेदीतून ‘अस्तित्वा’चा आरसा जरा जास्तच चकाकणार

त्यांची संवादाची लकब व्यवस्थित आहे. मात्र, सामाजिक व मूलभूत विकासाबाबतीत त्यांचे वैयक्तिक कार्य म्हणजे कोरी पाटी आहे. असे असले, तरीही वडिलांची पुण्याई त्यांच्याबरोबर आहे. माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे पुत्र हीच त्यांची मोठी ओळख आहे. काँग्रेसच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गावभेटीचा पहिला टप्पा त्यांनीही पूर्ण केला. विचार केला तर दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित आहेत.

मात्र, डॉ. हीना गावित यांचा दहा वर्षांचा जनसंपर्क, स्वकार्यकर्त्यांची भक्कम फळी, साधलेला विकास आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी या गोष्टी त्यांच्याबाबतीत नक्कीच उजव्या ठरणाऱ्या आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील जनता भाजपच्या विकासाला साथ देते की काँग्रेसच्या हाताला प्रतिसाद देते, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

Dr. Heena Gavit & Adv. Goval Padavi
Nandurbar Lok Sabha Constituency : डॉ. हिना गावित ठरल्या पहिल्या महिला खासदार, हॅटट्रीक करणार का ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.