Jayant Patil : मोदींना दिले, आता शहांनाही जनता उत्तर देईल! शरद पवारांवरील टीकेला जयंत पाटील यांचे उत्तर

Nandurbar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निष्ठावान कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Jayant Patil
Jayant Patilesakal
Updated on

Nandurbar News : केंद्र स्तरावरचा पद्मविभूषण पुरस्कार भारतीय जनता पक्ष सरकारने ज्येष्ठ नेते शरद पवारांना दिल्लीत बोलावून राष्ट्रपतींच्या हस्ते दिला आहे, हे गृहमंत्री अमित शहा विसरलेले दिसतात. अमित शहा भ्रष्टाचाराबाबत ज्याच्याबद्दल बोलत होते, ते आता त्यांच्याच समवेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेत दिले, तसे उत्तर आता राज्यातील जनता गृहमंत्री अमित शहा यांना विधानसभा निवडणुकीत देतील. (Jayant Patil)

असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शहा यांनी केलेल्या टीकेला येथे उत्तर दिले. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निष्ठावान कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, की राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीनंतर बऱ्याच गोष्टी ‘लाडक्या’ होऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणूक झाली नाही, तोपर्यंत राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातील गोरगरीब, सामान्य माणसाकडे पाहायला उसंत नव्हती. त्यांना वाटलं, आपलं सरकार येणार.

परंतु जनतेने त्यांना कुठेतरी रोखलं. सध्या राज्यातील जनता महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळे राज्यातील सरकार येणाऱ्या काळात बदलेल. पुन्हा निवडून येण्याचा काहीसा प्रयत्न आहे म्हणून अजून काही मोठमोठ्या योजना सरकार घोषित करेल. (latest marathi news)

Jayant Patil
Nandurbar News : मनोरुग्ण महिलेची अत्याचारातून प्रसूती; अक्कलकुवा पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील घटना

महाराष्ट्रद्वेषीविरोधात राज्य एकवटेल

लोकसभा निवडणुकी वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, शरद पवार यांच्या उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा त्यांनी केला. परंतु, महाराष्ट्राने त्याला चोख उत्तर दिले. अमित शहाही शरद पवार यांच्याबद्दल बोलले, महाराष्ट्रातील जनता त्यांनाही येणाऱ्या काळात चोख उत्तर देईल. जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रावर हे दोघे नेते हल्ला करतात.

परंतु राज्यातील उद्योग गुजरातमध्ये या दोघांच्याच प्रेरणेने गेले आहेत, हे मात्र ते सोयीस्कर विसरतात. महाराष्ट्राचे सरकार मात्र फक्त पाहत बसले आहे. राज्याचे उद्योग गेल्याने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्राविषयी काही लोक द्वेष करीत असतील तर सगळा महाराष्ट्र त्यांच्या विरोधात एकवटून उभा राहील, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

तेव्हा कोर्टात कोण गेले होते?

मराठा आरक्षणाबाबत श्री. पाटील म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आरक्षण दिले, तेव्हा न्यायालयात कोण लोक गेले, हे जनतेला माहीत आहे. देशातल्या जनतेने भाजपला रोखल्यावर महाराष्ट्राने भाजपविरोधी निकाल दिला. त्यामुळे राज्यातलं सरकारही लवकरच बदलणार आहे. सरकार वाचविण्यासाठी व पुन्हा निवडून येण्यासाठी लाडक्या योजना हा एक प्रयत्न आहे.

Jayant Patil
Nandurbar Teacher Recruitment: शिक्षकांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया; 268 जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com