नंदुरबार : मकरसंक्रांती सणाच्या वेळी प्लॅस्टिक किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी करण्यास पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अन्वये प्रतिबंध केला असल्याचे जिल्हा दंडाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.
नायलॉन मांजामुळे पक्षी व मानव जीवितास इजा होते. काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात. मकरसंक्रांतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्याचा खेळ खेळला जातो. पतंगासह तुटलेले नायलॉन मांजाच्या धाग्यांचे तुकडे जमिनीवर पडतात.
नायलॉन मांजाचे तुकडे लवकर विघटन होण्याजोगे नसल्याने गटारे व नदी-नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. तसेच नायलॉन मांजाच्या तुकड्यांमुळे गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो.
हेही वाचा: जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
अशा धाग्यांमधील प्लॅस्टिकच्या वस्तूंमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात. माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरते. प्लॅस्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याचा सणाच्या वेळी करण्यात येतो.
त्यामुळे पक्ष्यांना व मानवी जीवितास तीव्र इजा होण्याच्या नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन अशा धाग्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, तसेच साठवणूकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. वर्षभरात त्यांची साठवणूक, हाताळणी व विक्री होणार नाही.
नायलॉन मांजाच्या धाग्याच्या दुष्परिणामांबाबत शाळा, महाविद्यालय तसेच लोकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांनी निर्देशाचे पालन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.