Nandurbar News : सारंगखेडच्या घोडे बाजारामुळे स्थानिक महिलांना मिळतोय रोजगार; चारा व्यवसायातून मोठी उलाढाल

 horses market
horses marketesakal
Updated on

कळंबू : सारंगखेडा येथे ७ डिसेंबरपासून यात्रोत्सवाला सुरवात झाली आहे. यात्राकाळात परिसरातील व स्थानिक सामान्य नागरिकांना रोजगार मिळत असतो. यात्रेचे आकर्षक पाळणे सांभाळण्यासाठी अनेक तरुणांना रोजगार दिला जातो. त्याच्यातून त्यांना १० ते १५ हजार रुपये मानधन दिले जाते.

सारंगखेड्यासह कळंबू, अनरद, पुसनद, कुकावल, कोठली, वडाळी, बामखेडा, तोरखेडा तसेच टेंभे त.सा, देऊर, कमखेडा, बिलाडी, बामखेडा, टाकरखेडाशेजारील गावातील नागरिक, तरुण यात्रेत विविध व्यवसाय थाटून रोजगार प्राप्त करत असतात. स्थानिक व परिसरातील लोकांचे वार्षिक नियोजन सारंगखेडा यात्रोत्सवातून ठरते. सामान्य लोकांना यात्रेमुळे आर्थिक पाठबळ मिळत असते म्हणून सारंगखेडा यात्रोत्सवाची नागरिक उत्सुकतेने वाट पाहतात.

हेही वाचा: Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

 horses market
Kolhapur News: धरण फुटलं अन् होत्याचं नव्हतं झालं...

अश्वांना विविध प्रकारचे खाद्य

घोडेबाजारात घोड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य लागते . त्यात प्रामुख्याने चारा, हरभरा, मका, गव्हाच्या भुशासारखे खाद्य लागते. घोड्यांना चारा खाद्य पोषक व महत्त्वाचे असते. घोडेमालक हिरवा चारा खरेदी करण्याला प्राधान्य देत असतात. म्हणून परिसरातील व स्थानिक महिला बांधावरील चारा काढून त्याची मोळी तयार करून दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत विक्री केली जाते. मोठ्या किमतीच्या अश्वांना काजू, बदाम, दुधासारखा खुराख दिला जातो, चाराविक्रीतून एक महिला दिवसातून चार ते पाच मोळ्या विक्री करून कुटुंबाला हातभार लागतो.

 horses market
Nashik Crime News : बंदी असलेल्या मागुर माशासह संशयित पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.