Nandurbar News : राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

Nandurbar News : आयुक्त चित्रा कुलकर्णी या २२ व २३ फेब्रुवारी २०२४ ला नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असल्याचे राज्य सेवा हक्क आयोग नाशिक विभाग नाशिकचे उपसचिव सुनील जोशी यांनी कळविले आहे.
State Service Rights Commission Commissioner Chitra Kulkarni
State Service Rights Commission Commissioner Chitra Kulkarniesakal
Updated on

Nandurbar News : राज्य सेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी या २२ व २३ फेब्रुवारी २०२४ ला नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असल्याचे राज्य सेवा हक्क आयोग नाशिक विभाग नाशिकचे उपसचिव सुनील जोशी यांनी कळविले आहे.

आयुक्त कुलकर्णी यांचा हा दौरा असा- गुरुवारी (ता. २२) सकाळी आठला नाशिक येथून नंदुरबारकडे प्रयाण, दुपारी दोनला शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे आगमन.

दुपारी तीनला पालिका नंदुरबार येथे कार्यालय तपासणी, सायंकाळी पाचला उपवनसंरक्षक नंदुरबार वन विभाग नंदुरबार येथे कार्यालयीन तपासणी, रात्री आठला शासकीय विश्रामगृह भोजन व मुक्काम.

शुक्रवारी (ता. २३) सकाळी नऊला नंदुरबारहून नवापूरकडे प्रयाण, सकाळी साडेदहाला नवापूर येथे आगमन, साडेदहा ते दुपारी एकपर्यंत सेतू.

State Service Rights Commission Commissioner Chitra Kulkarni
Nandurbar News : जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेत 10 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रत्येक तालुक्यात भरारी पथके कार्यान्वित

ई-सेवा केंद्र व विविध कार्यालयांची तपासणी, दुपारी एक ते दोन तहसील कार्यालय येथे विविध तालुकाप्रमुख यांची आढावा बैठक, दुपारी दोन ते तीन भोजन व

दुपारी तीन ते रात्री आठ परतीचा प्रवास राहणार आहे. या दौऱ्यात कार्यालयीन तपासणी करण्यात येणार आहे. संबंधितांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमविषयक माहिती देण्यात येणार असून, त्याअनुषंगाने संबंधित कार्यालयाने अद्ययावत माहिती तयार ठेवावी, असेही उपसचिव जोशी यांनी शासकीय पत्रानुसार कळविले आहे.

State Service Rights Commission Commissioner Chitra Kulkarni
Nandurbar News : उकाई डॅमचे बॅकवॉटर उचलण्यासाठी १६ लिफ्टची निर्मिती : डॉ. विजयकुमार गावित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.