Nandurbar News : मोकाट जनावरे, कुत्र्यांच्या झुंडीने ग्रामस्थ त्रस्त

stray dogs
stray dogsesakal
Updated on

तळोदा : शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची, मोकाट गुरे व वराह यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे नागरिकांना लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावी अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.

stray dogs
Nandurbar News : आधारभूत किमतीत कडधान्य खरेदीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

तळोदा शहरातील विविध रहिवासी भागात विशेषतः बस स्टॅन्ड, धान्य मार्केट परिसर, चिनोदा रोड परिसर, मेन रोड आदी भागत मोकाट जनावरे, कुत्रे, व वराह हे झुंडीने असतात. या मोकाट प्राण्यांच्या झुंडीमुळे वाहन चालकांचे लहान-मोठे अपघात सातत्याने घडत आहेत. यामुळे अनेकांना जायबंदी व्हावे लागल्याचा अनुभव आहे.

रहिवासी भागांमध्ये कुत्र्यांची व वराहांची संख्या वाढली असून या प्राण्यांकडून लहान मुलांना चावा घेण्याचे प्रकार देखील वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीती देखील निर्माण झाली आहे. नागरिकांकडून वेळोवेळी या समस्यांबाबत संबंधित विभागाला तसेच, प्रशासनाने तक्रारी व निवेदने देण्यात आली आहे. त्याची दखल न घेतल्याने या प्राण्यांच्या त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

सकाळी शहरातील व नवीन वसाहतीतील मंदिरांमध्ये नियमित पूजा करण्यासाठी महिलांसह पुरुष, लहान मुलेही जात असतात. असंख्य महिलांना मंदिरात पायीच जावे लागते. काही महिला, ज्येष्ठ महिला पहाटेच निघतात त्यावेळेस कुत्र्यांपासून व मोकाट गुरे, वराह यांच्यापासून त्रास होत आहे.

stray dogs
Nandurbar News : नवापूर महामार्गाजवळ वाहनांचा चक्काजाम

अपघात होण्याची शक्यता

अनेकदा अचानक पळत आलेल्या झुंडीमुळे दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने यांच्या लहान मोठे अपघात झालेले आहेत. अशा मोकाट कुत्रे, जनावरे, वराह यांच्या त्रास वाहनचालक, नागरिक, महिला, शाळकरी मुले यांना सहन करावा लागत आहे.

यामुळे शहरात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, तळोदा शहरातपूर्वी प्रमाणे नगर पालिकेचा कोंडवाडा होणेही गरजेचे झाले आहे. मोकाट फिरणाऱ्या गुरे, वराह व कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा व नवीन कोंडवाडा तयार करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.