Nandurbar News : महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त आनंदाच्या शिधाचे वितरण करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. हा ‘आनंदाचा शिधा’ ज्या पिशव्यांवर देण्यात येतो यापूर्वीही त्यावर भगवान गणराय, प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्रे छापली होती. ही पिशवी टिकाऊ नसून टाकाऊ असल्याने त्या पिशव्या नको त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या आहेत. (Anandacha Shidha Bag)
त्यामुळे देव-देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान होतो. शासनाने गणेशोत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ पिशव्यांवर श्री गणरायाचे आणि यापुढे हिंदू देव-देवता आणि राष्ट्रपुरुष यांची छायाचित्रे छापू नयेत, या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठामंत्री यांना जिल्हा पुरवठा अधिकारी मिसाळ यांच्यामार्फत देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र शासन आनंदाचा शिधा नावाने महाराष्ट्रातील जनतेला अल्पदरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय स्तुत्य असला तरी आनंदाच्या शिधा ज्या पिशव्यांमध्ये वितरित केला जातो त्यावर हिंदू देव-देवता आणि राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे छापलेली असतात.
पिशव्यांची गुणवत्ता बघता त्या टिकाऊ नाहीत तर टाकाऊ असतात. थोड्या दिवसांनी त्या फाटतील आणि रस्त्यावर किंवा नको त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत मिळू शकतात. त्यामुळे हिंदू देव-देवता आणि राष्ट्रपुरुषांच्या छायाचित्राचा अवमान होऊ शकतो म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि प्रशासनाने देव-देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे छायाचित्र नसलेल्या पिशव्यांचा आनंदाच्या शिधासाठी वापर करावा, असे निवेदनात नमूद केले आहे. (latest marathi news)
यांनी दिले निवेदन
निवेदनावर हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, मोठा मारुती मंदिराचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी, श्री संत दगाजी महाराज मंदिर चौपाळेचे मोहन पटेल, विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष रतिलाल पटेल, गणपती मंदिराचे मुख्य पुजारी प्रदीप भट, भागवताचार्य रवींद्र पाठक, बाबा गणपती मंडळाचे सुनील सोनार, पीयूष सोनार.
मयूर सोनार, श्री दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष अमोल सोनार, मारुती व्यायामशाळेचे अर्जुन मराठे, घारू कोळी, संत नरहरी व्यायामशाळेचे ओम सोनार, ओम जितेंद्र सोनार, श्री गणेशमंडळाचे अरुण सोनार, हिंदुत्ववादी घनश्याम मराठे, हिंदू सेवा सहाय्य समितीचे जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, सुयोग सूर्यवंशी, जयेश भोई, विजय जोशी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.