चिनोदा : तळोदा तालुक्यातील तलावडी शिवारातील एका शेतकऱ्यावर तब्बल दहा एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकावर नांगर फिरविण्याची नामुष्की ओढवली. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. तलावडी शिवारात शेतकरी प्रशांत सुपडू माळी व भगवान माळी या भावंडांची शेती आहे. दोन्ही भावंडांनी जून महिन्यात सोयाबीनची लागवड केली होती. (Plow plowed on 10 acres of soybeans shame on farmer of Talavadi )