Nandurbar Police News : कुडकुडणाऱ्या निराधारांना खाकीची ऊब

Nandurbar Police News
Nandurbar Police NewsESAKAL
Updated on

शहादा : अवघे जग सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करीत असताना जिल्ह्यातील पोलिस दलाने वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले. जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून थंडीत कुडकुडत फुटपाथवर उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना मायेची ऊब देत शहादा पोलिसांनी ब्लॅंकेट व चादरवाटप केले. ‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार खाकीतल्या माणुसकीने निराधारदेखील भारावून गेले.

Nandurbar Police News
Dhule News : धुळे पोलिसांवर गुरे हाकण्याची वेळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही ‘खो’

नववर्षाच्या जल्लोषात होणाऱ्या स्वागतासाठी कुठेही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी जिल्हा पोलिस दल अलर्ट मोडवर होते. त्यासाठी जागोजागी पोलिसांनी दिवसा व रात्री नाकाबंदी, पेट्रोलिंग बंदोबस्त लावला होता. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह सर्वच पोलिस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर होते.

यादरम्यान त्यांना कडाक्याच्या थंडीत असंख्य निराधार जागोजागी रस्त्याच्या कडेला, बस स्टॅन्ड, दुकानांच्या आडोशाला कुडकुडत उघड्यावर झोपल्याचे पोलिस अधीक्षकांना दिसून आले. त्यांनी तत्काळ सर्वच सहकाऱ्यांना अशा निराधार व्यक्तींना सहकार्य करण्याचे सूचित केले.

हेही वाचा: जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

शहादा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनीदेखील सहकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांच्या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करीत गरीब, फिरस्ते व भिक्षुक अशा असंख्य गरीब व निराधारांच्या अंगावर स्वतःच्या हातांनी ब्लॅंकेट व चादर पांघरून मायेची ऊब दिली. खाकी वर्दीच्या नववर्षाच्या या अनोख्या उपक्रमाने भारावून गेलेल्या निराधारासह नागरिकांनीही कौतुक केले आहे.

Nandurbar Police News
Sambhaji Bhide : टिकलीचा आग्रह सोडला; खाकी वर्दीसमोर नरमले?

''अनेक वेळा थंडीने मृत पावणाऱ्या नागरिकांच्या मृतदेहाचे पंचनामे करताना मन दुःखी होते. जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना मायेची ऊब देऊन पुण्याचे काम करताना मनस्वी आनंद झाला व समाधान वाटले.'' -राजन मोरे, प्रभारी पोलिस निरीक्षक, शहादा पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()