Nandurbar Political News : NDA ला जेवढ्या जागा तेवढ्या वृक्षांचे रोपण! तळोद्यातील आगळीवेगळी चर्चा

Nandurbar News : या लक्षवेधी घोषणेचे कौतुक आणि काहीही होवो, पण तेवढी झाडे लावा आणि त्याची देखभाल अन संगोपनाचे प्रामाणिक प्रयत्न करावेत असे देखील यानिमित्ताने बोलले जात आहे.
Tree Plantation & PM Modi
Tree Plantation & PM Modiesakal
Updated on

तळोदा : लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, कोण जिंकून येईल किंवा पराभूत होईल याचीच चर्चा होताना दिसत आहे. मात्र तळोद्यात सध्या एक वेगळीच चर्चा रंगत आहे. भाजपचे शहराध्यक्ष गौरव वाणी यांनी भाजपला जेवढ्या जागा मिळतील तेवढे वृक्षारोपण आणि त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला आहे.

त्यामुळे त्यांच्या या लक्षवेधी घोषणेचे कौतुक आणि काहीही होवो, पण तेवढी झाडे लावा आणि त्याची देखभाल अन संगोपनाचे प्रामाणिक प्रयत्न करावेत असे देखील यानिमित्ताने बोलले जात आहे. (Resolution Planting trees as much as seat for NDA in loksabha election 2024)

लोकसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणीत एनडीए तसेच काँग्रेसची इंडिया आघाडी यांच्यात सत्तेसाठी जोरदार चुरस दिसून येत आहे. कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील, हे तर चार जूनला घोषित होणाऱ्या निकालात स्पष्ट होणार आहे. त्याअनुषंगाने भाजपचे शहराध्यक्ष गौरव देवेंद्रलाल वाणी एनडीएला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्या संख्येत शहरात वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे आणि ५ जूनला पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. (latest marathi news)

Tree Plantation & PM Modi
Dombivli MIDC Blast : डोंबिवली दुर्घटनेत अधिकारी दोषी असतील तर...; कामगार मंत्र्यांची ग्वाही

लावलेल्या रोपांची निगा राखत ते शंभर टक्के कसे जगतील यादृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र त्यांच्या या संकल्पनेची चर्चा होताना दिसत आहे. गौरव वाणी यांनी घेतलेला संकल्प नक्कीच कौतुकास्पद असून त्याचा भविष्यात हरित तळोदयासाठी फायदाच होईल असे बोलले जात आहे.

Tree Plantation & PM Modi
Maharashtra Latest Live Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवरती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.