Nandurbar Power Cut: कंकाळामाळ परिसरात 2 आठवड्यांपासून बत्तीगुल! महिनोमहिने वीज पुरवठा खंडित; महावितरण कर्मचारी उदासीन

Power Cut News : रोहित्र आणि फ्यूज पेट्यांची दुरवस्था, तारांना आलेले झोळ, वाकलेले खांब या महावितरणच्या कारभारातील जीवघेण्या बाबी म्हणून पुढे येतात.
Power Cut
Power Cutesakal
Updated on

खापर : अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील दऱ्याखोऱ्यात वसलेल्या कंकाळामाळ परिसरात तब्बल दोन आठवड्यांपासून वीजपुरवठा खंडित आहे. या परिस्थितीकडे महावितरणने दुर्लक्ष केले असून अद्यापही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. (Nandurbar power cut in Kankalamal area for 2 weeks)

रोहित्र आणि फ्यूज पेट्यांची दुरवस्था, तारांना आलेले झोळ, वाकलेले खांब या महावितरणच्या कारभारातील जीवघेण्या बाबी म्हणून पुढे येतात. वीज बिलासाठी मोठा तगादा लावणाऱ्या महावितरणने या बाबींकडे गांभिर्याने पाहण्याची गरज ग्राहक व्यक्त करीत आहेत. अपुरे कर्मचारी, वीजबिल चुकवेगिरी, वीजचोरी करणारे भुरटे चोर या बाबींवर बोट ठेऊन नागरीकांना वेठीस धरणाऱ्या महावितरण आणि प्रामुख्याने शासनाने या बाबींकडे लक्ष देणे गरजेचेही बोलले जात आहे.

वीज निर्मिती, वीज वितरण, वीज पारेषण अशी पूर्वीच्या वीज मंडळाची विविध कंपन्यांमध्ये विभागणी केली आहे. एमएसईबी होर्डिंग ही कंपनी या सर्व कंपन्यांची पालक संस्था म्हणून काम पाहते. या सर्व व्यवस्थेत ग्राहक म्हणून सामान्य नागरिकांचा संबंध महावितरण या कंपनीशी येतो.

या कंपनीच्या भोंगळ नियोजनाचा त्रास ग्राहकांना होत असल्याच्या अनेक तक्रारी तालुक्याभरात वारंवार होतात. पारेषणकडून घेतलेली वीज आणि ग्राहकांकडून होणारी वीजबिल वसुली यातील तफावतीचे सर्व खापर महावितरणवर फोडले जाते. या दोन-तीन कंपन्यांच्या अंतर्गत कारभारामुळे वितरण व्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप होत आहे. (latest marathi news)

Power Cut
चिपळूणमध्ये भोंदूबाबासह दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले; करणी दूर करण्यासाठी महिलांकडे मागत होते 'इतके' रुपये

वीज कंपन्यांची सेवा आणि सुविधा, वीज बिल वसुलीची पद्धत आणि उपाय, कर्मचाऱ्यांचा अभाव आणि ग्राहकांबद्दल तक्रारी ही परिस्थिती राज्यभर बहुधा सारखीच असल्याचे वीज ग्राहकांचे म्हणणे आहे. किमान प्रामाणिक ग्राहकांना नियमीत सुविधा देता येईल यासाठी महावितरण, महापारेषण आणि महानिर्माण या सर्व कंपन्यांच्या संयोगातून सेवा सुविधा ग्राहकांपर्यंत किमान प्रामाणिक ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी उपाय योजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

दुरुस्तीसाठी महिन्यापर्यंत प्रतीक्षा

वीज चोरी आणि वीज गळतीकडे लक्ष नाही. या सर्व प्रकारात प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना मिटरभाड्यापासून इंधन अधिभारापर्यत अनेक अगम्य बाबींचा भुर्दंड होत आहे. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय अनेकदा वीज ग्राहकांना येत आहे.

वीजबिल वसुलीसाठी महावितरणाचे कर्मचारी तगादा लावतात, थेट दऱ्याखोऱ्यात पोचतात परंतु दुरुस्तीसाठी तब्बल ३-४ महिने येत नाहीत. आदिवासी भागात राहणाऱ्यांवर थेट दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.

Power Cut
Viral Audio Clip: दारूचे दुकान लवकर बंद झाल्याची तक्रार, "खासदार म्हणाले दिल्लीतून पाठवू का"? ऑडिओ क्लिप व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.