Nandurbar Pre-Monsoon Rain : वादळी पावसाने शहाद्यात 106 घरांचे नुकसान

Pre-Monsoon Rain : वादळी पावसात १०६ घरांना हानी पोचल्याची माहिती प्राथमिक पाहणीतून समोर आली असून, शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Damage caused by uprooting of lemon trees planted in fields due to stormy winds in Shiwar.
Damage caused by uprooting of lemon trees planted in fields due to stormy winds in Shiwar.esakal
Updated on

Nandurbar Pre-Monsoon Rain : तालुक्यात मृग नक्षत्राचा पहिल्याच दिवशी झालेल्या वादळी पावसात १०६ घरांना हानी पोचल्याची माहिती प्राथमिक पाहणीतून समोर आली असून, शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वादळाचा फटका वीज वितरण कंपनीलाही बसला. यात २७२ वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. शुक्रवारी रात्रीच्या आपत्तीनंतर दोन दिवस तालुक्यातील काही ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. (106 houses damaged in Shahada due to stormy rain )

कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत वीजपुरवठा सुरळीत केला. शहादा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे केळी, पपई पिकांसह आंबा, लिंबू झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी दिवसभर महसूल विभागाचे कर्मचारी माहिती घेत होते.

यात तालुक्यातील विविध गावांमध्ये १०६ घरांची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. या पंचनाम्याचे अहवाल तयार करून तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार आहेत. वादळी पावसाने तालुक्यातील केळीबागांचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याने तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (latest marathi news)

Damage caused by uprooting of lemon trees planted in fields due to stormy winds in Shiwar.
Dhule Pre-Monsoon Rain : कापडणे परिसरात मुसळधार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला

दरम्यान, वादळामुळे वीज खांब, तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा ठप्प झाला होता. महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल झटकर यांनी पाहणी करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार शुक्रवारी रात्रीपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना हाती घेत कामाला सुरवात केली होती. शनिवारी सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.

वीज वितरणचे ९० लाखांवर नुकसान

तालुक्यातील मलोणी, डोंगरगाव, कवळीथ, ससदे, राणीपूर, चिरडा, ब्राह्मणपुरी, जवखेडा, लक्कडकोट गाव आणि शिवारात वादळामुळे झाड वीज वाहिन्यांवर कोसळल्याने २७२ खांब कोसळले. जागोजागी १२८ ठिकाणांच्या वीज तारा तुटून पडल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केल्याने धडगाव आणि तळोदा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत झाला होता.

दरम्यान,शहादा विभागात गेल्या दोन महिन्यात सतत तीन वेळा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने वीज वितरण कंपनीला त्याचा मोठा फटका बसला असून वीज खांब आणि वीज तारा तुटल्याने ९० लाख ७८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Damage caused by uprooting of lemon trees planted in fields due to stormy winds in Shiwar.
Nashik Pre-Monsoon Rain : वादळी पावसाने घेतला दोघांचा बळी; उमराणेत शेड कोसळून एकाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.