Nandurbar Bribe Crime : 50 रुपये घेणे महागात; लाचलुचपतकडून 1 ताब्यात

Nandurbar News : महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी वाहन चालकांकडून ५० रुपयांची लाच घेताना आरटीओचा खासगी पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
Nandurbar Bribe Crime
Nandurbar Bribe Crimeesakal
Updated on

नवापूर : सीमा तपासणी नाक्यावर गुजरात राज्यातून मालवाहू चारचाकी वाहन (टेम्पो) महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी वाहन चालकांकडून ५० रुपयांची लाच घेताना आरटीओचा खासगी पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे प्रादेशिक परिवहन मंडळाच्या कामकाजावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Nandurbar Bribe Crime)

याबात ३९ वर्षीय एका व्यक्तीने तक्रार केली होती. नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील खासगी पंटर इरसाल हन्नान पठाण (वय ४७, रा. लाखाणी पार्क, नवापूर) याला ५० रुपायांची लाच घेताना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

मालवाहू चारचाकी वाहन (टेम्पो) गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीतील नवापूर सिमा तपासणी नाक्यावर ५० रुपये लाचेची मागणी केली. सदर रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर खासगी व्यक्ती इरसाल हन्नान पठाण यास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. (Latest Marathi News)

Nandurbar Bribe Crime
Nandurbar Bribe Crime : निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे यांना 3 दिवसांची पोलिस कोठडी

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक एन. बी. थोरात, पोलिस हवालदार राजेश सुवारे, हर्षद तारी, योगेंद्र परदेशी, पोलिस नाईक पदमाकर पारधी यांनी कारवाई केली.

नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा येथील सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्‍यांच्या हस्तकांकडून एन्ट्रीच्या नावाने पैसे उकळले जात असल्याचे नेहमी आरोप केले जातात. या तपासणी नाक्यावर नेहमीच एजंट ठाण मांडून असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

Nandurbar Bribe Crime
Dhule Bribe News : 50 हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक बोरसे ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.