Priyanka Gandhi : भाजपची विचारधारा आदिवासींविरोधी : प्रियांका गांधी; पंतप्रधान मणिपुरातील आदिवासींवरील अत्याचारावर का बोलत नाहीत?

Lok Sabha Election 2024 : प्रियांका गांधी म्हणाल्या, की माझ्या आजी इंदिराजी व माझ्या आई सोनिया यांच्याकडून मी आदिवासी संस्कृतीचा सन्मान करण्याचे शिकले. इंदिराजींनी तुम्हाला जल, जंगल व जमिनीचा अधिकार दिला आहे.
Congress candidate Adv. Congress leader Priyanka Gandhi speaking at a public meeting held on the occasion of Gowal Padavi's campaign
Congress candidate Adv. Congress leader Priyanka Gandhi speaking at a public meeting held on the occasion of Gowal Padavi's campaignesakal
Updated on

नंदुरबार : काँग्रेसने नेहमीच आदिवासी समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसने आपल्या प्रचाराचा प्रारंभरही नेहमीच नंदुरबारमधून केला. अनेक चांगल्या योजनांची सुरवात नंदुरबारमधून केली, कारण त्यांचे नंदुरबारवर विशेष प्रेम होते. आदिवासी संस्कृतीशी काँग्रेस समरस झाली होती.

तोच प्रयत्न आताही काँग्रेस करीत आहे. काँग्रेसची विचारधारा गरीब आदिवासी संस्कृतीचा सन्मान करणारी आहे; तर भारतीय जनता पक्षाची विचारधारा आदिवासींच्या संस्कृतीविरोधी आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आज येथे केले.

मणिपूरमधील आदिवासींवरील अत्याचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी चकार शब्दही काढत नाहीत. आदिवासींना न्याय देण्याचा देखावा करणारे मोदी राष्ट्रपतींना मात्र राम मंदिराच्या उद्‍घाटनाला बोलवत नाहीत, यावरूनच त्यांची आदिवासीविरोधातील भूमिका स्पष्ट दिसते, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. (nandurbar Priyanka Gandhi sabha allegation on BJP)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी आज सकाळी साडेअकराला प्रियांका गांधी यांची सभा झाली. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ॲड. के. सी. पाडवी, शिरीषकुमार नाईक, गोवाल पाडवी, प्रतिभा शिंदे, अभिजित पाटील, जयपाल रावल, नसीम खान, दिलीप नाईक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदच्चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदेसिंह पाडवी, रिपब्लिकन पक्षाचे श्री. कुवर आदी उपस्थित होते.

प्रियांका गांधी म्हणाल्या, की माझ्या आजी इंदिराजी व माझ्या आई सोनिया यांच्याकडून मी आदिवासी संस्कृतीचा सन्मान करण्याचे शिकले. इंदिराजींनी तुम्हाला जल, जंगल व जमिनीचा अधिकार दिला आहे. संविधान जागृत ठेवले. जेव्हा-जेव्हा आवश्‍यकता होती, तेव्हा-तेव्हा त्या आपल्यात आल्या.

आपल्या समस्या, अधिकारासाठी लढल्या. काँग्रेसच्या राजवाटीत एससी, एसटी कार्ड बनले, राजीव गांधी यांच्या काळात एससी, एसटी अत्याचार निवारण समिती बनली. त्यांनीच पंचायतराज कायदा बनविला. त्यामुळे आपला कायदा अधिक बळकट झाला. सोनियाजी, मनमोहनजी यांनी मनरेगाचा कार्यक्रम नंदुरबारपासून सुरू केला.

राहुल गांधी यांनी चार हजार किलोमीटरची काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढली. आपले प्रश्‍न, आपले दुःख समजण्यासाठी आपल्यात येण्यासाठी ही यात्रा त्यांनी केली, असे सांगून प्रियांका गांधी म्हणाल्या, की काँग्रेसची राजकीय विचारधारा ही महात्मा गांधी यांनी दिली आहे.

त्यांनी सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला. त्या मार्गावर काँग्रेस आपले काम करीत आहे. काँग्रेसचे सर्व नेते राजकीय लोकतंत्रात जनता सर्वश्रेष्ठ आहे, असे मानून काम करीत आहेत. मात्र, भाजपची एक वेगळी विचारधारा आहे. ते आपले प्रश्‍न, दुःख, संस्कृती समजत नाहीत, जेथे त्यांना संधी मिळते, तेथे आपली संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करतात.

जेथे आदिवासींवर अत्याचार झाला, मोठमोठे नेते, पंतप्रधान मोदींसारखे नेतेही दुर्लक्ष करतात. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाला, घरे जाळली. मात्र, मोदी काहीही बोलले नाहीत, चूप राहिले. मध्य प्रदेशात एका आदिवासी मजुरावर लघुशंका केली गेली, तेव्हाही भाजपचा एकही नेता काहीही बोलला नाही. मात्र, निवडणूक आली तेव्हा माफी मागायला गेले, ही यांची खरी सत्यता आहे.’ (latest marathi news)

Congress candidate Adv. Congress leader Priyanka Gandhi speaking at a public meeting held on the occasion of Gowal Padavi's campaign
Priyanka Gandhi: ...तरच भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल; प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

सर्वोच्च पदाचाही सन्मान नाही

‘आपली संस्कृती व आपला आवाज दाबण्याचे काम भाजप करीत आहे. जेव्हा-जेव्हा आपला आवाज बुलंद होतो, अधिकारासाठी लढतो, तेव्हा-तेव्हा आपल्यावरील अन्यायाच्या वेळी आपल्या बाजूने उभे राहण्याऐवजी आपल्यावर दबाव आणून आपला आवाज दाबला जातो. हेमंत सोरेन हे एकमेव आदिवासी मुख्यमंत्री आहेत, त्यांनाही जेलमध्ये टाकले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना सर्वोच्च पद देऊन त्यांचा सन्मान केला, ही आनंदाची बाब आहे. मात्र, त्यांच्या सर्वोच्च पदाचा सन्मान केला जात नाही. राष्ट्रपती मुर्मू यांना नवीन संसदेच्या उद्‍घाटनाला बोलविले नाही. राष्ट्रपतींकडून सर्व महत्त्वाची कामे केली जातात.

मात्र, उद्‍घाटन पंतप्रधान मोदी स्वतः करतात, राष्‍ट्रपतींना बोलावत नाहीत. श्रीराम मंदिराचे उद्‍घाटन मोदींनी केले, राष्ट्रपतींच्या हस्ते केले नाही. कारण, त्या आदिवासी समुदयातील आहेत. मोदींना गरीब- मागास व्यक्ती पुढे गेलेले पसंत नाही, असा आरोप प्रियांका यांनी केला.

Congress candidate Adv. Congress leader Priyanka Gandhi speaking at a public meeting held on the occasion of Gowal Padavi's campaign
Priyanka Gandhi: "पंतप्रधान प्रचाराला आले की, लहान मुलासारखे रडतात," प्रियंका गांधींचा नंदुरबारमध्ये हल्लाबोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.