Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ 12 मार्चला नंदुरबारमध्ये

Bharat Jodo Nyay Yatra : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चपासून महाराष्ट्रात दाखल होत आहे.
After inspecting the meeting grounds, MLA and former minister Balasaheb while discussing with former minister, MLA KC Padvi.
After inspecting the meeting grounds, MLA and former minister Balasaheb while discussing with former minister, MLA KC Padvi.esakal
Updated on

Nandurbar News : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चपासून महाराष्ट्रात दाखल होत आहे. नंदूरबार येऊन यात्रा महाराष्ट्रात पुढे मार्गक्रमण करणार आहे. गांधी घराण्याची निवडणुकांचा प्रचाराची पहिली सभा नंदुरबार मधूनच होण्याची परंपरा राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच या सभेचा निमित्ताने नंदुरबारमधून सुरू होणार आहे.

नंदुरबार आदिवासी बहूल जिल्हा असला तरी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख दिल्ली दरबारी होती. (Nandurbar Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra on March 12)

After inspecting the meeting grounds, MLA and former minister Balasaheb while discussing with former minister, MLA KC Padvi.
Nandurbar News : प्रत्येक कामगाराला गृहोपयोगी 30 भांड्यांचा संच : डॉ. विजयकुमार गावित

येथील जनतेचे गांधी घराण्यावर व गांधी घराण्याचे येथील जनतेशी अतुट नाते होते. तसेच नंदुरबार मधील निवडणुकीची पहिली सभा झाल्यावर कॉंग्रेसने हमखास यश मिळविल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करीत असताना त्याची पहिली सभा १२ मार्चला नंदुरबार येथे होणार आहे.

बाळासाहेब थोरातांकडून नियोजनाचा आढावा

१२ मार्चला होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता.१२) कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात नंदुरबार येथे आले होते. त्यांचा सोबत नंदुरबार कॉँग्रेस निरीक्षक राजाराम पानगव्हाणे, माजीमंत्री ॲड के. सी. पाडवी.

आमदार शिरीषकुमार नाईक, माजी खासदार बापू चौरे, दिलीप नाईक, प्रतिभा शिंदे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. श्री. थोरात यांनी राहुल गांधी येथील त्यांचा हेलिपॅडचे ठिकाणी, सभेचे ठिकाण असलेले सी. बी. मैदानाची पाहणी केली.

After inspecting the meeting grounds, MLA and former minister Balasaheb while discussing with former minister, MLA KC Padvi.
Nandurbar News : 217 प्रकरणे निकाली, 90 लाख भरपाई वसूल : शहाद्यात लोकन्यायालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.