Nandurbar Monsoon Rain : तळोदा तालुक्यात सरासरीच्या 87 टक्के पाऊस! पावसाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक

Monsoon Rain : तालुक्यातील चारही महसूल मंडळांत पावसाची आकडेवारी असमान आहे. त्यात सर्वांत कमी पाऊस बोरद मंडळात असून, सर्वांत जास्त पाऊस सोमावल मंडळात झाला आहे.
mosnoon rain
mosnoon rainesakal
Updated on

तळोदा : तळोदा तालुक्यात यंदाच्या मॉन्सून सत्रात सरासरीच्या ८७ टक्के पाऊस झाला असून, अजून पावसाळ्याचे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात पावसाची स्थिती समाधानकारक दिसून येत आहे. असे असले तरी तालुक्यात पावसाचे असमान वितरण आहे.

अर्थात तालुक्यातील चारही महसूल मंडळांत पावसाची आकडेवारी असमान आहे. त्यात सर्वांत कमी पाऊस बोरद मंडळात असून, सर्वांत जास्त पाऊस सोमावल मंडळात झाला आहे. त्यात पावसाच्या स्थितीने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधान आहे. (87 percent of average rain in Taloda Taluka)

तालुक्यात तळोदा, बोरद, प्रतापपूर व सोमावल या महसूल मंडळात पावसाची आकडेवारी गोळा केली जाते. त्यानुसार ४ ऑगस्टपावेतो तळोदा तालुक्यात तळोदा ६९३, बोरद ५२४, प्रतापपूर ६०० व सोमावल ७६२ मिलिमीटर याप्रमाणे पाऊस झाला आहे. त्यात तालुक्यातील धनपूर, रोझवा, इच्छागव्हाण, गढवली, सिंगसपूर या लघुपाटबंधारे प्रकल्पांत समाधानकारक पाणीसाठा झाला असून, प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

दुसरीकडे मागील वीस दिवसांपासून तालुक्यात सूर्यदर्शन जेमतेमच झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतांमध्ये तण वाढले असून, पिकांची वाढ मात्र खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’सारखी स्थिती आहे.

दुसरीकडे तळोदा तालुक्याची पावसाची सरासरी ७८८ मिलिमीटर आहे. त्यात ४ ऑगस्टपावेतो एकट्या तळोदा मंडळात ६९३ मिलिमीटर, तर सोमावल मंडळात ७६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यात सरासरीच्या ८७ टक्के पाऊस झाला असून, अजून पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. (latest marathi news)

mosnoon rain
Koyna Dam : कोयना धरणातून 50,000 वरुन 40 हजार क्युसेक विसर्ग; कृष्णा-कोयना नदीकाठाला मिळणार दिलासा!

त्यामुळे पावसाच्या आकडेवारीवर शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे तालुक्यातील सातपुड्यात उगम पावणारे सर्व नदी-नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र तालुक्यातील महसूल मंडळातील पावसाची आकडेवारी असमान आहे.

तळोदा तालुका मंडळनिहाय पावसाची आकडेवारी ४ ऑगस्ट २०२४ पर्यंत

(तालुक्याची पावसाची सरासरी ७८८ मिलिमीटर)

महसूल मंडळ पाऊस (मिमीमध्ये) पावसाची टक्केवारी

तळोदा - ६९३ ८७ टक्के

बोरद - ५२४ ६६ टक्के

प्रतापपूर - ६०० ७६ टक्के

सोमावल - ७६२ ९६ टक्के

mosnoon rain
Dhule Monsoon Rain : अखेर यंदा पहिल्यांदाच ‘पांझरा’ खळाळली! अक्कलपाड्यातून विसर्ग सुरू; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.