म्हसदी : साक्री विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. मतदानाची तारीखही जाहीर झाली आहे. अवघ्या काही दिवसात निवडणुकीत रंगही चढेल. लोकशाही पद्धतीत दर पाच वर्षात निवडणुका अटळ असतात. दुसरीकडे सामान्य जनतेच्या समस्या मात्र जैसे थे आहेत. त्या कधी पूर्ण होतील, हा खरा प्रश्न आहे.
केवळ विकास साधल्याचा बेगडी देखावा सादर केला जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आश्वासनांचा पाऊसही पडेल. स्थानिक प्रश्नांवर परंपरेनुसार प्रत्येकवेळी होणारी चर्चा यंदाही होणार. पुन्हा त्या मागे पडणार. मग समस्या, प्रश्न सुटतील कधी, हे विधान निरुत्तर देणारे ठरणार आहे.