Nandurbar Rain Update : नंदुरबार जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा; वादळी वाऱ्यांमुळे गेला एकाचा जीव

In connection with the incident in prtappur, angry citizens took the body in an ambulance and reached Taloda police station.
In connection with the incident in prtappur, angry citizens took the body in an ambulance and reached Taloda police station. esakal
Updated on

Nandurbar News : गुजरातमधून घोंगावत आलेल्या चक्रीवादळाचा रविवारी (ता. ४) नंदुरबार जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला. या वादळामुळे घरे, शाळा आणि झोपड्यांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले.

अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून, विजेचे खांबही वाकले आहेत. केळीच्या बागेतील खोड आडवे झाले असून, काढलेली केळीही पावसात सापडल्याने शहादा तालुक्यात मोठी हानी झाली आहे.

या चक्रीवादळात प्रतापपूर (ता. तळोदा) येथे धावत्या करावर वडाचे झाड कोसळून एक जण ठार, तर दुसरा जखमी झाला. दुसऱ्या एका घटनेत ३० मेंढ्यांचा मृत्यू झाला. नंदुरबार शहरात काही ठिकाणी वीजतारा घासल्याने आगीच्या घटना घडल्या. (Nandurbar Rain Update Cyclone hit Nandurbar district One life was lost due to stormy winds Nandurbar news)

गुजरातमध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नंदुरबार तालुक्यात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास गुजरातकडून आलेल्या चक्रीवादळाबरोबरच जोरदार पावसाला सुरवात झाली. वाऱ्याचा वेग खूपच जास्त असल्याने घरे, झोपड्या, काही शाळांवरील पत्रे कागदासारखी उडाली.

यामुळे अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांतील वाड्या-पाड्यांवरील ग्रामस्थ उघड्यावर आले. शहादा तालुक्यालाही वादळाचा जोरदार फटका बसला. जवळपासा दोन तास वादळी वाऱ्याचा धिंगाणा सुरू होता. तळोदा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले.

तळोदा-चिनोदा रस्त्यावर जोरदार वादळी वाऱ्यामुळे प्रतापपूर (ता. तळोदा) येथील राजेंद्र मराठे यांना जीव गमवावा लागला. ते प्रतापपूरहून आपल्या अर्टिगा गाडीने तळोद्याला येत होते. त्यादरम्यान अचानक वादळी वाऱ्यांना सुरवात झाली.

त्यांची गाडी चिनोदा रस्त्यावरील पुलाजवळ आली असता अचानक भल्या मोठ्या वडाचे झाड त्यांच्या गाडीवर पडले. यात गाडीचा पत्रा कापला गेल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

In connection with the incident in prtappur, angry citizens took the body in an ambulance and reached Taloda police station.
Nandurbar News : हवेचा वेग 65 किलोमीटर प्रतितास; राजस्थान, गुजरातमधील कमी दाबाच्या प्रभावामुळे जिल्ह्याला फटका

मृतदेह नेला पोलिस ठाण्यात

घटनास्थळी दोन जेसीबी मशिन मागवून गाडीवरील झाड बाजूला करण्यात आले. दरम्यान, हे वडाचे झाड जीर्ण झाले होते, ते काढावे, यासाठी संबंधित विभागाला कळवूनही ते न काढले गेल्याने एकाचा जीव गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

प्रतापपूर व परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करीत रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवून तळोदा पोलिस ठाण्यात नेला. संबंधित विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली. आमदार राजेश पाडवी, डॉ. शशिकांत वाणी, सुरेश इंद्रजित व नागरिकांनी तहसीलदार गिरीश वाखारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्याशी चर्चा केली.

अधिकाऱ्यांनी दोषी असणाऱ्या विभागावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी मृतदेह पोलिस ठाण्यातून नेला.

राजेंद्र मराठे आपले वाहन भाडेतत्त्वावर देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. कमावत्या व्यक्तीचा जीव गेल्याने प्रतापपूर गावासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

In connection with the incident in prtappur, angry citizens took the body in an ambulance and reached Taloda police station.
Kirankumar Bakale News : बकालेंमुळे माझा नवरा झाला दरोडेखोर झाला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.