नंदुरबार : गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यातच नंदुरबार जिल्ह्यात गणेश मंडळाच्या वतीने तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि दुसरा मानाचा बाबा गणपतीचे एक खास वैशिष्ट्य आहे. बाबा गणपतीची मूर्ती ही कोणत्याही कारखान्यात किंवा कुठल्याही प्रकारच्या ठसाद्वारे तयार केली जात नाही, तर ही मूर्ती तयार केली जाते चक्क चार ते पाच टन काळ्या मातीचा वापर करून श्रमदानातून केली जाते. तीही पर्यावरणपूरक असते. (Rich Baba Ganesha Tradition For 138 Years)