Nandurbar News : तळोद्यातील रस्त्याच्या स्थितीचे व्यंग्यचित्र व्हायरल!

Nandurbar News : शहरात पाणीपुरवठ्यासाठी लागणारी जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे.
caricature that went viral on social media.
caricature that went viral on social media.esakal
Updated on

तळोदा : शहरात पाणीपुरवठ्यासाठी लागणारी जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. त्यासाठी रस्ते खोदावे लागत असताना खोदलेली चारी व्यवस्थित बुजविली जात नसल्याने शहरात गल्लोगल्ली रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात खोदकाम करणाऱ्या ठेकदारावर कोणतीही देखरेख नसल्याने मनमानी पद्धतीने रस्ता खोदून बुजविला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (Nandurbar Road conditions caricature in Taloda goes viral)

त्यामुळे शहरातील रस्त्यांवर होणारे खोदकाम व्यवस्थित बुजविले जावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बहुप्रतीक्षित हातोडा तापी पाणीपुरवठा योजनेसाठी संपूर्ण शहरात नव्याने जलवाहिनी टाकली जात आहे. त्यासाठी गल्लोगल्ली चारी खोदून पाइप टाकले जात आहेत.

त्यामुळे रस्ते खोदावे लागत असल्याने सर्वत्र मातीचे ढिगारे व जलवाहिनी तसेच खोदून ठेवलेली चारी असे दृश्य दिसत आहे. त्यात खोदण्यात आलेली चारी व्यवस्थित बुजविली जात नसल्याने रस्त्यावर उंचवटे तयार होऊन सर्व रस्ते ओबडधोबड बनले आहेत. त्यामुळे गल्लोगल्ली मातीचे ढीग दिसत असताना दुचाकी व चारचाकी वाहने काढताना जिकिरीचे जात आहे.

त्यात पायी जाणाऱ्यांना तर हाल सहन करावे लागत आहेत. त्यात कोठेही खोदकामाविषयी व रस्ता वापरण्याबद्दल सूचनाफलक लावले जात नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे खोदलेल्या भागात रस्ते व्यवस्थित बुजवावेत, ज्या भागात खोदकाम होत आहे तेथे फलक लावावेत, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. (latest marathi news)

caricature that went viral on social media.
Dhule News : 60 किलो कांद्यासाठी 32 हजारांचा दंड..! रात्रभर वाहन थांबविले, काट्यात तफावतीचा संशय

व्यंग्यचित्र व्हायरल

व्यंग्यचित्रकार पंडित भामरे यांनी शहरातील रस्त्याची स्थिती वर्णन करणारे व्यंग्यचित्र काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खोदकाम व्यवस्थित होत नसल्याने शहरातील नागरिकांच्या भावनांना वाट मोकळी करून दिल्याने चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने यात हस्तक्षेप करून ठेकेदाराला सूचना करण्याची मागणी केली जात आहे.

योजनेची शहरात उत्सुकता

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत-२ अभियानांतर्गत तळोदा शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेत हे खोदकाम सुरू आहे. या कामासाठी २९ कोटी ५० लाखांचा निधी मिळाला आहे. त्यात तापी नदीवरून पाणी आणून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जलकुंभाचेदेखील काम प्रगतिपथावर आहे.

त्यामुळे भविष्यात तळोदा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघून भूजलावर असलेला पाणीपुरवठा बंद होऊन तापी नदीचे पाणी शहरवासीयांना मिळणार आहे. त्यामुळे या योजनेची शहरात उत्सुकता आहे.

caricature that went viral on social media.
Dhule News : वर्षभरानंतरही बायोगॅस प्रकल्प अपूर्णच! 12 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.